कोलवा रेसिडेन्सीच्या पुनर्विकासासाठी नव्याने निविदा

कोलवा रेसिडेन्सी रिसॉर्ट म्हणून विकसित करण्यासाठी पूर्वीचे कंत्राटदार अयशस्वी ठरल्याने केली कारवाई
New tender for redevelopment of Colva Residency
New tender for redevelopment of Colva ResidencyDainik Gomantak

पणजी: कोलवा रेसिडेन्सी रिसॉर्ट म्हणून विकसित करण्यासाठी पूर्वीचे कंत्राटदार अयशस्वी ठरल्याने, गोवा पर्यटन प्रकल्प पुन्हा निविदा काढणार आहे. जुन्या पक्षासोबतचा करार रद्द करण्यात आला असुन, त्यांची बँक हमी जप्त करण्यात आली. तसेच निवडणुकीच्या निकालानंतर, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, नवीन निविदा काढली जाईल, असे पर्यटन अधिकाऱ्यांनी सांगितले. (New tender for redevelopment of Colva Residency)

New tender for redevelopment of Colva Residency
मडगाव अर्बन बॅंकेतील ठेवीदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरु

“नियुक्त कंत्राटदार कोणतेही काम चोख केले नाही, म्हणुनच हा प्रकल्प अयशस्वी ठरला, आता आम्ही ते रिसॉर्ट म्हणून विकसित करण्यासाठी केलेला करार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे पर्यटन अधिकाऱ्यांनी सांगीतले. काही पर्यटन प्रकल्प कोस्टल रेग्युलेशन झोनच्या (Costal Zone) कक्षेत येतात आणि कोलवा (Colva) रेसिडेन्सी त्यापैकी एक आहे.

कंत्राटदारांना वारंवार नोटीस बजावूनही त्यांनी प्रगती दाखवली नाही. म्हणुनच करार रद्द करण्यात आला आणि बँक (Bank) हमी जप्त करण्यात आली असे त्यांनी सांगीतले, तसेच विभाग जमीन भाडेतत्त्वावर देणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. निविदेद्वारे नियुक्त केलेले कंत्राटदार आपले व्हिजन अंमलात आणण्यासाठी मोकळे असतील, परंतु ते सीआरझेड नियमांमध्ये असावे. म्हणजेच जुने बांधलेले क्षेत्र न ओलांडता नवीन संरचना उभारण्यास परवानगी दिली जाईल. ही आणि ही सामान्य प्रक्रिया आहे,”असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com