Goa Panchayat: सत्तरी तालुक्यात उमलले नवे चेहरे

निकाल ऐकण्यासाठी गर्दी : विश्‍वजीत यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन
Goa Panchayat Election Result
Goa Panchayat Election Result Dainik Gomantak

वाळपई: सत्तरी तालुक्यात आज झालेल्या ग्रामपंचायतींच्या मतमोजणीनंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या काही कट्टर समर्थकांना दणके बसून पराभवाचा सामना करावा लागला, तर काही नवीन उमेदवारांचा विजय झाला. आज सकाळी ठीक आठ वाजता मतमोजणीला वाळपई बसस्थानक सभामंडपात सुरवात झाली होती. यावेळी सकाळपासून समर्थकांनी निकाल ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

(New faces win in sattari talukas for goa panchayat election)

Goa Panchayat Election Result
Goa Petrol Price: कच्च्या तेलात घट, गोव्यात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर कमी?

मंत्री विश्वजीत राणेंचे स्वीय सचिव सुनिल मराठे यांच्या पत्नी उत्तरा मराठे यांना नगरगावातून प्रभाग एकमधून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी चंद्रकांत मानकर हे २९ मतांनी विजयी झाले. नगरगावातून प्रभाग पाचमधून राणेंच्या कार्यकर्त्या सौ. लक्ष्मी हरवळकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. हरवळकर यांचा देवयानी गावकर यांनी २३ मतांनी पराभव केला.

खोतोडा पंचायत प्रभाग सातमधून राणेंचे जवळचे कार्यकर्ते तथा माजी पंच संतोष गावकर यांचा पराभव झालेला आहे. भिरोंडा प्रभाग तीनमधून माजी सरपंच नितीन शिवडेकर यांचाही पराभव झाला आहे. असे असले तरी अनेक विजयी उमेदवार राणे समर्थक असल्याने एकूण सत्तरी तालुक्यात भाजपने झेंडा फडकावला आहे.

यावेळी गुळेली पंचायत क्षेत्रातील महत्वाची पंचायत प्रभाग असलेल्या प्रभागात संतोषी नाईक या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. यावेळी त्या म्हणाल्या, आपले प्रथम प्राधान्य गावाचा विकास आहे. तसेच आपण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Goa Panchayat Election Result
Goa Petrol Price: कच्च्या तेलात घट, गोव्यात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर कमी?

आंबेडेतून माजी सरपंच अभ्यंकर विजयी

नगरगाव प्रभाग चारमधून माजी सरपंच राजेंद्र अभ्यंकर हे विजयी झाले आहेत. त्यांना २३५ मते मिळाली आहेत. खाडिलकरांनी जिंकली अस्तित्वाची लढाई : नगरगावातून प्रभाग ६ ब्रम्हाकरमळीतून मोठी अटीतटीची लढत निश्चित होती. तेथे आरोग्यमंत्र्यांचे अगदी जवळचे स्नेही व साहेबांचे जीवलग कार्यकर्ते उद्योजक पुरुषोत्तम खाडिलकर यांच्या पत्नी संध्या खाडिलकर महिला राखीवतेतून मैदानात होत्या. त्यांच्या विरोधात सौ. अमिता देसाई रिंगणात होत्या. गेल्या काही दिवसांपासून हा प्रभाग बराच चर्चेत आला होता. बरीच अटीतटीची लढत निश्चित होती. त्यानुसार सौ. खाडिलकर यांना ३५१ मते, तर सौ. देसाईंना ३१६ मते मिळाली. त्यामुळे अगदी मोठ्या अस्तित्वाच्या लढतीत खाडिलकर यांनी ३५ मतांनी बाजी मारत गड जिंकला.

आरोग्यमंत्र्यांची सहकार्याची ग्वाही

सर्व विजयी झालेल्या उमेदवारांना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व डॉ. दिव्या राणे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच येणाऱ्या काळात गावाच्या विकासासाठी एकत्रित राहून गावातील विकासाला चालना देण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. तसेच नवीन पंचांना आपले वेळोवेळी पाठिंबा व सहकार्य असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक उपस्थित होते.

धावे, उस्तेतून खरवत बंधू विजयी

नगरगावातून प्रभाग तीनमधून मामू जानो खरवत , प्रभाग दोनमधून माजी सरपंच रामू जानो खरवत हे दोघे बंधू विजयी झाले आहेत. मामू खरवत यांना धावेतून ३५३, तर उस्तेतून रामू खरवत यांना ३१९ मते मिळाली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com