मुलीला कॉलेजमध्ये सोडायला जाताना काळाचा घाला! दुचाकीवर झाडाची फांदी कोसळून आईचा मृत्यू

मुलगीही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत
Navelim Accidental Death News
Navelim Accidental Death NewsDainik Gomantak

Navelim Accidental Death News

झाडाची फांदी पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नावेली येथे घडली आहे. मुलीला कॉलेजला सोडायला जात असताना त्यांच्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली. यामध्ये मुलीच्या आईचा जागीच मृत्यू झाला.

Navelim Accidental Death News
Karmal Ghat Traffic Jam: करमल घाटात कंटेनर पलटी; वाहतूक इतर मार्गाने वळवली

ऑलीविया सिल्वा असे महिलेचे नाव आहे. अपघात घडल्यानंतर त्वरित रुग्णवाहिकेला बोलावण्यात येऊन सदर महिलेला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेली मुलगीही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, नावेली महामार्गावर धोकादायक झाडे असून, यामुळे वाहनचालकांना याचा त्रास होऊ शकतो, अशी तक्रार याआधी करण्यात आली होती. ही झाडे हटवण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

परिणामी आज एका महिलेला आपला जीव गमवावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com