Panaji News: रावांचे दर्शन फक्त नायडूंसोबतच

Panaji News: सरकारची मेहेरनजर : महामार्ग कामाबाबत बोंबाबोंब असूनही कारवाई नाही
Former Vice President M. Venkaiah Naidu
Along with the contractor M. V. Rao.
Former Vice President M. Venkaiah Naidu Along with the contractor M. V. Rao.Dainik Gomantak

Panaji News: राष्ट्रीय महामार्ग ६६च्‍या बांबोळी ते पत्रादेवीपर्यंतच्‍या कामाबाबत वाहनचालकांचे अनेक आक्षेप आहेत. पेडणे तालुक्यातील जनता तर या कामामुळे त्रस्त झाली आहे. जनतेचा हा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोचत नाही याला एक मोठे कारण आहे.

कंत्राटदार एम. व्ही. राव यांच्यापर्यंत सरकारी कारवाईचे हात पोचू शकत नाहीत. एक मोठी ढाल कंत्राटदार आणि सरकार यांच्यात आहे.

ती भेदणे आजच्या घडीला तरी शक्य नसल्याचे दिसते. माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या प्रत्येक गोवा दौऱ्यात राव यांना विमानतळापासून सर्वत्र खास स्‍थान असते.

आत्ताच्या नायडू यांच्या दौऱ्यावेळीही राव यांचे त्यांच्यासोबत दर्शन झाले आणि यावर जणू शिक्कामोर्तबच झाले.

नायडू यांचा राव यांच्या डोक्यावर असलेला वरदहस्त प्रत्येकवेळी त्यांना कारवाईपासून वाचवतो अशी चर्चा आहे. याच कारणास्तव जनतेने कितीही टाहो फोडला

सरकारी जावई असल्यासारखाच थाट

एम. व्ही. राव यांचे दर्शन तसे दुर्लभ. सरकारने कधी कामासंदर्भात पाचारण केले तर सरव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याला त्यांच्याकडून रवाना केले जाते. सार्वजनिक कार्यक्रमांतही ते अभावानेच दिसतात. मात्र नायडू यांचा गोवा दौरा त्यास अपवाद आहे.

नायडू आले की राव यांचे दर्शन घडतेच. उपराष्ट्रपतिपदी असताना नायडू राजभवनात राहण्याऐवजी राव यांच्या निवासस्थानी दुपारच्या भोजनासाठी आणि मुक्कामाला गेले

होते अशीही चर्चा आहे. यामुळे राव त्‍यांचा थाट सरकारी जावई असल्यासारखाच आहे.

एम. व्ही. राव कंपनी बनली टीकेची धनी

राज्यातील महामार्ग कामाच्या दर्जावरून राव यांची कंपनी सर्वाधिक टीकेची धनी बनत आहे. एम. व्ही. आर. नावाने कंत्राट घेतलेली कंपनी ओळखली जाते. ही कंपनी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची सर्वांत आवडती कंपनी.

तसेच राव हे आवडते कंत्राटदार, अशी ओळख तयार झाली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात राव यांना कामे मिळणे स्वाभाविकच होते. तशी ती मिळत गेली.

अजूनही मिळतात. असे असले तरी महामार्ग कामाच्या दर्जाबाबत सर्वसामान्य जनताही प्रश्न उपस्थित करत आहे. पत्रादेवी ते बांबोळी महामार्ग रुंदीकरणाचे उदाहरण त्यासाठी दिले जाते.

शेजारील राज्‍यांतील महामार्गाच्‍या कामांचा दर्जा उच्च! : गोव्‍याच्‍या शेजारील सिंधुदुर्ग आणि कारवारमधील महामार्गाच्या कामांचा दर्जा आणि पत्रादेवी ते बांबोळी महामार्गाच्या कामाचा दर्जा यात खूप फरक आहे. गोव्‍यातील कामाच्या दर्जाकडे बोट दाखविले जाते.

त्याला सरकारकडे सध्या तरी उत्तर नाही. त्या विषयावर कोणी बोलण्यासही तयार नाही. पुढेसुद्धा भाजपच्या वर्तुळातून बोलण्यास कोणी धजावेल असे वाटत नाही. कारण नायडू यांच्या परवाच्याच दौऱ्यात राव यांनी दर्शन देत आपले स्थान अढळ असल्याचे दाखवून दिले आहे.

तरी त्याचा ध्वनी सरकारच्या दरवाजाला आपटून परत येतो. कारण राव यांचे राजकीय नाते. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राव यांचे नाते काय याची माहिती सार्वजनिक होत नसली तरी नायडू यांच्या प्रत्येक दौऱ्यावेळी राव दिसून येतात.

एरवी त्‍यांचे सार्वजनिकरीत्या दर्शन होत नाही. नायडू उपराष्ट्रपतिपदी असतानाही राज्यपाल, मुख्यमंत्री व सरकारी अधिकाऱ्यांच्या बरोबरीने राव त्‍यांच्‍या स्वागतासाठी दाबोळी विमानतळावर पोचले होते. त्यांच्यासाठी राजशिष्टाचार बाजूला ठेवला गेला होता. यावरून ते भाजप सरकारच्या काळातील किती महत्त्वाची व्यक्ती आहेत हे स्‍पष्‍ट होते.

महामार्ग क्राँक्रीटचा केला गेला आहे. तो समपातळीत नसल्याने वाहनांचे सस्पेंशन कितीही चांगले असले तरी हादरे जाणवतातच असा वाहनचालकांना अनुभव आहे. पेडणे तालुक्यात अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांचे काम करण्यात आलेले नाही.

Former Vice President M. Venkaiah Naidu
Along with the contractor M. V. Rao.
Goa Tiger Project: व्याघ्र प्रकल्पाबाबत सरकार ‘बॅकफूट’वर

काहींच्या घराकडे जाणारे मार्ग बंद झाले. रस्त्याचे काम रखडत गेले, ते कधी पूर्ण होणार याचे उत्तर जनतेला मिळत नाही. पेडण्याच्या आमदारपदी मनोहर (बाबू) आजगावकर असताना त्यांची आणि कंत्राटदाराची जवळीक असल्याचा आरोप केला जात असे.

त्यानंतर आजगावकर यांचा पराभव झाला व प्रवीण आर्लेकर आमदार झाले. जनता या कंत्राटदाराच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असताना आमदारांना जणू त्याचे काहीच पडून गेलेले नाही असे पेडण्यात चित्र आहे.

राव यांच्याविरोधात ‘ब्र’सुद्धा सत्ताधारी वर्तुळात का उच्चारला जात नाही याचा कानोसा घेतला असता नायडू यांच्याशी असलेली जवळीक तसे करण्यापासून सर्वांना परावृत्त करते अशी माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com