Mumbai Goa Highway Accident
Mumbai Goa Highway AccidentDainik Gomantak

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात; दुचाकी चालकाचे निधन

गोव्याहून पुणे येथे जाताना टाटा नेक्झोनची धडक बसून हा अपघात झाला.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला या अपघातात दुचाकी चालकाचे निधन झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव ओटव फाटा खालची मुस्लिमवाडी येथे गुरुवारी (दि.16) हा अपघात झाला.

गोव्याहून पुणे येथे जाताना टाटा नेक्झोनची धडक बसून हा अपघात झाला.

धर्मराज केशव राणे (रा. टेंबवली, देवगड) असे या अपघातात निधन झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

गोव्याहून पुणे येथे जाताना कारची दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला. दुचाकीवर असणारे धर्मराज यामध्ये गंभीर जखमी झाले, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक गोव्याहून पुण्याच्या दिशेने होता. याचवेळी धर्मराज केशव राणे कणकवलीवरून देवगडकडे जात होते. दरम्यान, नांदगाव ओटव फाटा ब्रीजजवळील मिडलकटवर आले असता दोघांमध्ये अपघात झाला.

यात जखमी धर्मराज यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com