Morjim Bridge : पंडिर पुलाच्या दुरुस्तीची प्रतीक्षा; स्थिती धोकादायक

Morjim Bridge : पावसाळ्यापूर्वी डागडुजी न केल्यास दुर्घटनेचा धोका
 Bridge
Bridge Dainik Gomantak

Morjim Bridge :

मोरजी, पंचायत क्षेत्रातील पंडिर येथे मागील पावसाळ्यापूर्वी धोकादायक ठरलेला मिनी पूल सरकारने दुरुस्त वा त्या जागी नवीन पूल उभारला नसल्याने संकट निर्माण झाले आहे.

या धोकादायक पुलावरून लोक वाहने घेऊन जात असल्यामुळे कधीही दुर्घटना घडू शकते. त्यासाठी सरकारने पावसाळ्यापूर्वी हा पूल दुरुस्त करावा, किंवा नवीन पूल उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पंडिर येथील एक ओहोळावर हा मिनी पूल आहे. गेल्या पावसाळ्यात तो ठिकठिकाणी खचला होता. रस्ताही खचला आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून हा पूल उभारणार असल्याचे जाहीर केले होते.

आमदार जीत आरोलकर यांनीही पाहणी करून या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले; परंतु वर्ष उलटले तरी या पुलाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

लोकप्रतिनिधींवर लोकांचा रोष

पंच सदस्य मंदार पोके म्हणाले की, हा पूल उभारावा म्हणून वर्षभर प्रयत्न करत आहोत. पंचायत निधीमधून हा पूल बांधण्याचा प्रस्ताव पंचायतीकडे ठेवला होता. पंचायतीनेही मंजुरी दिली होती. परंतु साबांखाने ना हरकत दाखला न दिल्यामुळे हा पूल रखडला आहे.

सध्या निवडणुकीचे दिवस आहेत. उमेदवार मतदारांकडे मते मागायला जातात. आम्ही स्थानिक असल्यामुळे या नेत्यांसोबत आम्हाला जावे लागते. त्यावेळी लोक आमच्यावर रोष व्यक्त करतात, असेही मंदार पोके म्हणाले.

 Bridge
Goa Daily News Wrap: सांगोल्डा कारवाई, लोकसभा निवडणूक, गुन्हे; राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा

ना हरकत दाखल्यामुळे रखडले काम

सरपंच मुकेश गडेकर म्हणाले की, पंचायतीने या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी सुमारे ३५ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. हा पूल साबांखाच्या हद्दीत येत असल्यामुळे त्यांनी ना हरकत दाखला देणे आवश्यक होते; परंतु तो अद्याप दिलेला नाही.

दुसरीकडे साबांखानेही या पुलासाठी सुमारे ४० लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. निविदाही काढली आहे; परंतु कामाला सुरुवात झाली नसल्याने त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. निदान पावसाळ्यापूर्वी हा पूल दुरुस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com