Mopa International Airport: मोपा गावात विमानतळ तर झाले, आता दैनंदिन साधनसुविधा कधी येणार?

Mopa International Airport: मोपा गावाचे नाव जागतिक पातळीवर नावारूपास आले
Manohar International Airport Mopa Goa
Manohar International Airport Mopa GoaDainik Gomantak

Manohar International Airport Mopa Goa: गेल्यावर्षी याच महिन्यात म्हणजे 11 डिसेंबरला मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यानंतर मोपा गावाचे नाव जागतिक पातळीवर नावारूपास आले. असे असले तरी गावात अद्याप आवश्यक दैनंदिन सुविधा पोहोचल्या नसल्याने नागरिकांना रोजच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Manohar International Airport Mopa Goa
Leopard In Goa: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला

गावात सतत वीज येत जात असते. सोबतच अपुरा पाणी पुरवठा, इंटरनेट आणि दूरध्वनी सेवेतील व्यत्यय, अरुंद रस्त्यांमुळे अपघातांची भीती अशा अनेक समस्यांचा इथल्या लोकांना सामना करावा लागत आहे.

इथल्या मुलांना खेळांसाठी मैदानाची सोय करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ते अद्याप पूर्ण झाले नाही. याबाबत तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे यांनी खंत व्यक्त केली.

त्या म्हणाल्या की, आता या समस्या नित्याच्याच झाल्या आहे. याबाबत सरकारने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com