IIT Goa: सांगेतील प्रकल्पाला भाजप नेत्यांचाच विरोध; मंत्री फळदेसाई यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

90 टक्के स्थानिकांचा या प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे फळदेसाई यांनी केले स्पष्ट
Subhash Phal Desai |Goa News
Subhash Phal Desai |Goa NewsDainik Gomantak

सांगे आयआयटी प्रकल्प प्रस्तावावरुन पुन्हा वातावरण तापू लागले आहे. काल दिनांक 27 नोव्हेंबर रोजी वरकटो-सांगे येथील शेतकऱ्यांनी सभा घेत ‘आयआयटी गो बॅक’चा नारा दिला. अशी स्थिती असताना आज पुन्हा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी भाजप नेते म्हणवून घेणाऱ्यांकडूनच विरोध केला जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणावरुन आता अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

(Minister Subhash Phaldesai has said that BJP leaders are opposed to the sanguem IIT project )

सांगे आयआयटी प्रकल्पाबाबत बोलताना मंत्री फळदेसाई म्हणाले की, सांगे प्रकल्पाला भाजप नेते म्हणवून घेणाऱ्यांकडूनच विरोध होत आहे. या नेत्यांनी चुकीची भुमिका घेतल्याने विरोध वाढल्याचे दिसत आहे. मात्र 90 टक्के स्थानिकांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे. त्यामुळे हा प्रकल्प सांगे येथेच होणार असल्याचे फळदेसाई यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

Subhash Phal Desai |Goa News
Rajesh Pednekar IFFI 2022: ‘वाघ्रो’नंतर आता आणखी एक मोहेंजोदडो' - राजेश पेडणेकर

IIT च्या समर्थनात कोण आणि विरोधात कोण ?

आयआयटी आमच्या जमिनीत नकोच, असा निर्धार करत काल ( रविवारी) वरकटो-सांगे येथील शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली आणि ‘आयआयटी गो बॅक’चा नारा दिला. तर दुसरीकडे मळकर्णेनंतर आता उगेवासीयांनीही ग्रामसभेत आयआयटीच्या समर्थनार्थ ठराव घेतला. त्यामुळे सांगे आयआयटी समर्थनात कोण आणि विरोधात कोण ? हा सवाल कायम आहे.

Subhash Phal Desai |Goa News
Goa News: 'समुद्री परिसंस्थेसाठी रांजा मासा महत्त्वाचा' - आदित्य काकोडकर

शेतकऱ्यांनी सुभाष फळदेसाईंना दिले थेट आव्हान

शेतकऱ्यांनी काढलेल्या मार्चात फळदेसाई यांना थेट आव्हान देत नको असलेला प्रकल्प जर सरकार रद्द करत नसल्यास लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांना माघारी बोलावण्याचा हक्क जनतेला आहे. त्यामुळे सांगेच्या आमदारांनी राजीनामा देऊन आयआयटीच्या विषयावर परत निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवावे, असे रोखठोक आव्हान आंदोलकांनी दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com