Railway Ticket News : तीन वर्षांत 52 कोटी वसूल; दंडात्मक कारवाई सुरूच

Railway Ticket News : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर करडी नजर
Goa Railway
Goa RailwayDainik Gomantak

Railway Ticket News : मडगाव कोकण रेल्वेकडून मागील तीन वर्षांत विनातिकीट प्रवास करणाऱ्या सुमारे दीड लाखापेक्षा जास्त व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईतून कोकण रेल्वे प्रशासनाला ५२ कोटींचा महसूल प्राप्त झालेला आहे. यंदा पहिल्या १० महिन्यांतच १०.७७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.

कोकण रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाईची मोहीम कडक केलेली आहे. याचाच परिणाम म्हणून कोकण रेल्वेला मिळणाऱ्या महसुलात वाढ होताना दिसत आहे. केवळ महसुलात वाढ व्हावी, या उद्देशाने तिकीट तपासनीसांकडून कारवाई केली जात नाही, तर प्रवाशांना तिकीट काढूनच प्रवास करण्याची सवय लागावी, यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी सांगितले.

कोकण रेल्वेचा मार्ग हा महाराष्ट्रातील रोहा स्थानकापासून कर्नाटकातील ठोकुरपर्यंतचा आहे. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांतून तिकीट तपासनीस फिरतात. रेल्वेस्थानकांवरही तिकीट तपासनीस प्रवाशांचे तिकीट तपासतात.

काटेकाेर तपासणी :

प्रवाशांनी रेल्वे प्रवास करताना योग्य तिकीट काढून प्रवास करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय रेल्वे स्थानक फलाटावर प्रवेश करतानाही फलाट तिकीट काढणेही गरजेचे आहे. त्याची तपासणीही रेल्वे तिकीट तपासनीसांकडून केली जाते.

रेल्वेस्थानकावर प्रवेश करताना फलाट तिकीट काढणे, प्रवासासाठी योग्य तिकीट काढणे, हे अत्यावश्यक आहे. अन्यथा रेल्वे तिकीट तपासणीसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. कोकण रेल्वे मार्गावरील दंडात्मक कारवाई यापुढेही सुरु राहणार असल्याने प्रवाशांनी तिकीट घेतल्याशिवाय प्रवास करु नये.

- बबन घाटगे, उपप्रबंधक तथा वरिष्ठ रेल्वे जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

कोकण रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई

गेल्या तीन म​हिन्यांत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांतून प्रवास करणाऱ्या

१४ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

करून ८६ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

Goa Railway
Goa Daily Top News: म्हादई सुनावणी, अपघात; दिवसभरातील ठळक घडामोडी जाणून घ्या

मागील तीन वर्षांत

विनातिकीट प्रवाशांवर

कारवाई

51.90 कोटींचा दंड

चालू आर्थिक वर्षांत ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुमारे

४०,००० विनातिकीट प्रवाशांवर तिकीट तपासनीसांनी कारवाई केली व त्यांच्याकडून

१० .७७ कोटींचा दंड वसूल केलेला आहे.

२०२१-२२ या आर्थिक वर्षात

५२,000

विनातिकीट प्रवाशांवर कारवाई १६.८० कोटींचा दंड

२०२२-२३ या आर्थिक वर्षात

६२,५९७ विनातिकीट प्रवाशांवर

दंडात्मक कारवाई

काटेकाेर तपासणी :

प्रवाशांनी रेल्वे प्रवास करताना योग्य तिकीट काढून प्रवास करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय रेल्वे स्थानक फलाटावर प्रवेश करतानाही फलाट तिकीट काढणेही गरजेचे आहे. त्याची तपासणीही रेल्वे तिकीट तपासनीसांकडून केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com