Khandola News : माशेलात मुलांसाठी सुसज्ज क्रीडा मैदान : मंत्री गोविंद गावडे

Khandola News : ‘कारो’ मैदानाचे उद्‍घाटन; सव्‍वाकोटी खर्च
Marcel
MarcelDainik Gomantak

Khandola News : खांडोळा, माशेल येथील मुलांना खेळाचा सराव करण्यासाठी शहरात जाण्याची गरज पडणार नाही. गावातच सुसज्ज मैदान उपलब्ध झाले आहे

. मुलांना या मैदानावर खेळून शौर्य दाखवावे आणि खेळातून आई-वडील, गावचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केले.

येथील कारो मैदानाचे खेळाडू व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंत्री गावडे यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आदिवासी कल्याण खात्यांतर्गत सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्च करून हे सुसज्ज मैदान बांधण्यात आले आहे.

Marcel
PM Modi Goa Visit: दुकाने, मार्केट 6 फेब्रुवारीला बंद; PM मोदींच्या सभेसाठी दक्षिण गोव्यात सुरक्षा वाढवली

कारो मैदान हे स्थानिकांचेच आहे. पालक, ग्रामस्थांच्या सहकार्याने मुलांचे भवितव्य चांगले व्हावे, या उद्देशाने सर्व सुविधायुक्त हे मैदान बनवले आहे, असे मंत्री गावडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, दामोदर नाईक, सरपंच जयेश नाईक, उपसरपंच सुमित्रा नाईक, पंच सदस्य, बेतकी, वेलिंग, वळवी, भोम पंचायतीचे सरपंच

उपस्थित होते.

मंत्री गावडे म्हणाले, त्याचा या मैदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा. हे मैदान फक्त मैदानच राहावे. तेथे अन्य विकृत गोष्टींना थारा देऊ नये.

यावेळी श्रमेश भोसले व बेतकी खांडोळाचे सरपंच विशांत नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच जयेश नाईक यांनी प्रास्ताविक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com