दुसऱ्याला हजारोंचा गंडा घालून गर्लफ्रेन्डसोबत गोव्यात हॉलिडेचा प्लॅन; विमानात बसताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हजारो रुपयांचा गंडा घालून गोव्याला पलायन करण्याचा प्लॅन फोल ठरला.
Pune - Goa Flight
Pune - Goa Flight Dainik Gomantak

Pune - Goa Flight: हजारो रुपयांचा गंडा घालून गोव्याला पलायन करण्याचा प्लॅन फोल ठरला. 29 वर्षीय तरुण गोव्याला उड्डाण करण्यासाठी विमानात बसताच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अ‍ॅपल आयफोन 14 प्रो (iPhone 14 PRO) सवलतीच्या किंमतीत देतो असे सांगून चोरट्याने गंडा घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गणेश अशोक भालेराव (वय 29, रा. खराडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

संशयित गणेशने 09 जानेवारी रोजी गणेश कोळी नावाने एका व्यक्तीला फोन करुन अ‍ॅपल आयफोन 14 प्रो (iPhone 14 PRO) सवलतीच्या किंमतीत देतो असे सांगितले. त्यासाठी तक्रारदाराकडून 84 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने घेतले.

पैसे घेऊन फोन न देता संशयित आरोपी गोव्याला पलायन करण्याच्या बेतात होता.

दरम्यान, तक्रारदाराने मुंबईत फसवणुकीची तक्रार दाखल केली. मुलूंड पोलिसांनी तक्रारीत प्राप्त माहितीनुसार संशयिताचा फोन ट्रेस केला असता तो पुण्यात आढळून आला.

संशयित पुणे-गोवा फ्लाईटमध्ये मैत्रिणीसोबत बसला होता, त्याचा गोव्याला पलायन करण्याचा प्लॅन होता. मात्र, मुलूंड पोलिसांनी सीआयएसएफ अधिकाऱ्यांना माहिती देऊन संशयित गणेशला अटक केली. तक्रारदाराने जमा केलेले पैसे संशयित गणेशकडून मागे घेण्यात आले असून, पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com