Mallikarjun Temple Goa : श्री मल्लिकार्जुन देवस्थानचा शिर्षारान्नी, वार्षिक जत्रोत्सव आज

आज शेळची भोवर; कौलप्रसाद
Mallikarjuna Temple Canacona, Goa
Mallikarjuna Temple Canacona, GoaDainik Gomantak

काणकोण भागातील पारंपरिक शिमगोत्सव अंतिम चरणात आला असून श्रीस्थळ, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानचा पारंपरिक शिर्षारान्नी व वार्षिक जत्रोत्सव उद्या रविवार दि. 12 रोजी, मध्यरात्री देवस्थानच्या चौकावरील कौल व पेन्नोटीतील विधीनंतर होणार आहे.

आज शनिवारी सकाळी सुवासिनी दिवज घेऊन श्री मल्लीकार्जुन देवाच्या प्रांगणात, तसेच किंदळे, खालवडे येथील निराकार देवस्थानात, दिवजांच्या भोंवरीत मोठ्या संख्येने (मिरवणुकीत) सहभागी झाल्या.

वेळीप, किंदळेकर देसाई गावकर व नगर्सेकर देसाई गावकर यांच्या तिन्ही भोवरी झाल्यावर बोळये व किन्नरकरांच्या मुलांचे कान टोचणे व मुलींना सुपली देणे कार्यक्रम झाला. रात्री 8 वा. श्रींची पालखी मिरवणूक व त्यानंतर गुलालोत्सव साजरा झाला.

Mallikarjuna Temple Canacona, Goa
Ratnagiri Madgaon: रत्नागिरी - मडगाव डेली एक्सप्रेस रद्द, 'या' तारखेपर्यंत सेवा राहणार बंद

आज शेळची भोवर; कौलप्रसाद

प्रसिद्ध षष्ठीची जत्रा उद्या दि. 12 रोजी साजरी होणार आहे. रविवारी सकाळी शेळची भोवर असेल. भोंवरी झाल्यावर 10.30 च्या सुमारास श्रींस तुलाभार अर्पण केला जाईल. दुपारी 2 वा. प्रसिद्ध शिर्षारान्नी उत्सव अवतार व कौल प्रसाद होईल.

दोन वर्षांनी येणाऱ्या या उत्सवास मोठ्या संख्येने भाविक येतात. उत्सवासाठी देवस्थान समिती व महाजन परिश्रम घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com