गोव्याला स्वावलंबी बनवण्यासाठी लोकांनी एकत्र यावे: राज्यपाल पिल्लई

संपूर्ण गोवा यात्रेचा भाग म्हणून पिल्लई यांनी पेडणे तालुक्याला भेट दिली.
P. S. Sreedharan Pillai
P. S. Sreedharan PillaiDainik Gomantak

पणजी: गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी मंगळवारी गोवावासियांच्या कठोर परिश्रमशील स्वभावाचे कौतुक केले आणि राज्याला स्वावलंबी बनवण्यासाठी लोकांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. (make goa self reliant says governor Sreedharan Pillai)

P. S. Sreedharan Pillai
गोवा डेअरीच्या आमसभेत येणार 'ऑडिटचा' विषय

संपूर्ण गोवा यात्रेचा भाग म्हणून पिल्लई यांनी पेडणे तालुक्याला भेट दिली. यावेळेस त्यांनी लोकांना संबोधित केले. गोव्याचा भारतातील सर्वात सुंदर राज्य म्हणून उल्लेख करताना पिल्लई म्हणाले, “गोव्याला भेट दिल्यानंतर मला जाणवले की गोवा हे भारतातील सर्वात सुंदर राज्य आहे. गोव्यातील लोक मनाने चांगले आहेत.

लोकशाहीत लोक सर्वोच्च असतात. त्यांची सेवा करताना खूप आनंद मिळतो. लोकांची सेवा हीच देवाची सेवा आहे," असे पिल्लई म्हणाले. त्यांनी मांद्रे तालुक्यातील सात डायलिसिस रुग्णांना (Patients) प्रत्येकी 25,000 रुपयांची आर्थिक मदत दिली. याचबरोबर त्यांनी पाण्याची टंचाई, योग्य रस्त्यांचे बांधकाम अशा समस्यांवर चर्चा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com