madhu poku naik
madhu poku naik

मधू पोकू नाईक यांचे निधन

पणजी

भंडारी समाजाच्या हितासाठी शेवटच्या  क्षणापर्यंत झटणारे उद्योजक मधू पोकू नाईक ऊर्फ मधुकर नाईक (वय ७१ वर्षे) यांचे आज सकाळी सहा वाजता बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उत्तररात्री दोन वाजताच्या सुमारास आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी मडकई येथे आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मधू हे हाताला काम मिळावे यासाठी मडकईतून पणजीत आले. स्वकष्टाने त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावले. भंडारी समाज सोसायटीच्या स्थापनेत ते सक्रीय होते. सोसायटीचे संस्थापक सचिव म्हणून त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली होती. भंडारी समाजाचा इतर मागास वर्गीयांत समावेश व्हावा यासाठीच्या आंदोलनावेळी त्यांनी समाज बांधवांच्या संघटनासाठी राज्य पिंजून काढले होते. ते भंडारी समाजाचे अध्यक्षही होते. मडकई येथील नवदुर्गा हायस्कूलच्या व्यवस्थापनातही ते सक्रीय होते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व नंतर कॉंग्रेसचे ते कार्यकर्ते होते. या दोन्ही पक्षांकडून मडकई मतदारसंघातून ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मधू हे आजारी असल्याने गेले तीन दिवस इस्पितळातच उपचार घेत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रीयाही झाली होती. त्यातून सावरत असतानाच मध्यरात्रीनंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि पहाटे प्राणज्योत मावळली.

त्यांच्या मागे पत्नी सुशीला, गोवा घाऊक मद्यविक्री संघटनेचे अध्यक्ष असलेले पूत्र दत्तप्रसाद नाईक, बालभवनच्या अध्यक्ष असलेली सून शीतल नाईक, दोन विवाहित कन्या असा परीवार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com