Margaon Rotary Club: मडगाव रोटरी क्लबचा ‘उमंग’ महोत्सव सुरू

रवीद्र भवनात कार्यक्रम : उद्या गायनाची अंतिम फेरी
Rotary Club
Rotary ClubDainik Gomantak

मडगावच्या रोटरी क्लबने आयोजित केलेल्या उमंग महोत्सवाला आजपासून रवीन्द्र भवन मडगावमध्ये उत्साहात सुरुवात झाली. सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हॉस्पिसियो इस्पितळातील रक्त पेढीतील डॉ. राविन रेगो यांच्या मार्गदर्शनाखाली सांड्रा रॉड्रिग्स, संजीव नायक, अक्षदा खांडेपारकर, रमेश यांनी या रक्तदान शिबिरात दात्यांना मार्गदर्शन केले.

आज सकाळी ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या गीत गायन स्पर्धेसाठी निवड केलेल्या अंतिम 23 स्पर्धकांसाठी प्रसिद्ध वादक विष्णू शिरोडकर व त्याच्या साथी वादकांच्या मार्गदर्शनाखाली तालीम घेण्यात आली. गायनाची अंतिम फेरी 17 मार्च रोजी संध्याकाळी 3.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

ज्या 23 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे, त्यांत श्रीराम शिमोगा, दत्ताराम धायमोडकर, संजीव शिरवईकर, अजीत नाईक, राजीव सिंगबाळ, सतीश केंकरे, कार्लोस ग्रासियस, फिलोमेना कुलासो, रोमेल फर्नांडीस, रुकमागत हळर्णकर, संजीव प्रभुदेसाई, विश्र्वनाथ स्वार, मंगेश तलवडकर, दामोदर खांडेपारकर, निशा पै काणे, प्रमिला बोरकर, राजस साळकर, अलका चोडणकर, डॉ. प्रदीप बोरकर, यशवंत शेटये, महेश बोरकर, प्रमोद हेदे व डॉ. एच पी पै यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com