Loksabha Election Voting : प्रचारतोफा आज थंडावणार; मतदानाची लगबग सुरू

Loksabha Election Voting : आज, उद्या पथके रवाना; दिव्यांगांना मतदान यंत्रापर्यंत सुरळीत जाता यावे, यासाठी आज व्हिलचेअर, रिक्षा आणण्यात आल्या असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक व्हिलचेअर उपलब्ध केली जाणार आहे.
Loksabha Election Voting
Loksabha Election VotingDainik Gomantak

Loksabha Election Voting :

पणजी, लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी (ता.७) होणार असल्याने प्रशासकीय पातळीवर त्याची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांचा जाहीर प्रचार उद्या (रविवारी) संध्याकाळी ७ वाजता अधिकृतरित्या संपणार आहे.

दिव्यांगांना मतदान यंत्रापर्यंत सुरळीत जाता यावे, यासाठी आज व्हिलचेअर, रिक्षा आणण्यात आल्या असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक व्हिलचेअर उपलब्ध केली जाणार आहे. सोमवारी प्रत्येक मतदान केंद्र परिसरात पाच रोपटी लावण्यात येणार असून ही साडेसात हजार रोपटी उद्या मतदान केंद्र पातळीवर उपलब्ध केली जाणार आहेत. मतदान केंद्रांवर तालुका पातळीवरून मतदान केंद्र कर्मचारी पथके सोमवारी सकाळपासूनच रवाना केली जाणार आहेत.

राज्यभरात एकूण १ हजार ७२५ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, उत्तरेत ८६३ आणि दक्षिणेत ८६२ मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांपैकी उत्तर गोव्यातील ४३ आणि दक्षिण गोव्यातील ४५ केंद्रे ही आदर्श केंद्रे म्हणून निवडण्यात आली आहेत. यापैकी ८ मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरे होणार असून मतदानानंतर ज्येष्ठ नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. ४० केंद्रांवर सर्व कर्मचारी महिला असतील.

Loksabha Election Voting
Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

व्हिलचेअर, रिक्षा दाखल, ७५०० रोपटी लावणार

केंद्रांवर पारंपरिक सजावट

उत्तर गोव्यातील ५ व दक्षिण गोव्यातील ५ मिळून १० मतदान केंद्रांवर केवळ दिव्यांग कर्मचारी कार्यरत असतील. रायबंदर येथे जुने गोमेकॉ आणि कुंभारजुवे येथील केंद्राची सजावट पारंपरिक मासेमारी या संकल्पनेवर केली जाणार आहे. मडगावातील ३६ क्रमांकांचे मतदान केंद्र हे पुरातन वास्तूत असून तशीच सजावट तेथे असेल. त्याजवळचे वाहतूक बेटही सजविले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com