Loksabha Election
Loksabha Election Dainik Gomantak

Loksabha Election : प्रचारासाठी पायाला भिंगरी, जनसामान्‍यांना भेटीची आस; पल्‍लवी धेंपे यांचा प्रचार

Loksabha Election : भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी ३० रोजी केपे व कुंकळ्ळी मतदारसंघात फिरून आपला प्रचार केला. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई तसेच माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हजर होते.

Loksabha Election :

केपे, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपण्याची तारीख जशी जवळ येत चालली आहे, तसा विविध राजकीय पक्षांचा प्रचारही जोरात सुरू आहे व यात भाजप पक्ष बराच आघाडीवर असल्याचे दिसून येते.

भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी ३० रोजी केपे व कुंकळ्ळी मतदारसंघात फिरून आपला प्रचार केला. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई तसेच माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हजर होते.

केपे मतदारसंघात धेंपे यांची ही प्रचाराची चौथी फेरी असून, यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कोपरा बैठकीतून धेंपे यांनी थेट मतदारांबरोबर संपर्क साधला. खासकरून महिलांबरोबर त्यांनी संवाद साधून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले.

केंद्र सरकारच्या अनेक योजना असून त्या त्यांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला एक संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी महिला मतदारांना तसेच खास करून नवीन मतदारांकडे केली.

पल्लवी या उच्चशिक्षित तसेच अत्यंत श्रीमंत घराण्यातील असल्याने समाजातील सामान्‍य लोकांना त्या भेटतील का, असा प्रश्न विरोधकांकडून केला जात होता. पण त्या सर्व घटकांतील लोकांबरोबर मिसळण्याचे चित्र केपे व कुंकळ्ळीतील प्रचारात दिसून आले.

विरोधक त्यांच्याविषयी काय बोलतात, याकडे त्या लक्ष देत नसल्याचे दिसून येते. आपण पूर्वीपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून लोकांची सेवा करण्यासाठी राजकीय क्षेत्र चांगले असल्याने आपण राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. त्‍याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना सेवा देता येणार असल्याचे त्यांनी लोकांना सांगितले.

विरोधकांचा अनुल्‍लेखाने प्रतिकार

पल्‍लवी धेंपे ह्या लोकांमध्‍ये जाऊन त्‍यांच्‍याशी संपर्क साधत आहेत. त्‍याचा फायदा त्यांना किती होणार आहे हे चार जून रोजी स्पष्ट होईल.

विरोधकांची पर्वा न करता आपले काम त्या करीत असल्याने व भाजप कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याने त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचल्या आहेत.

विरोधकांना त्या प्रत्युत्तर देत नसल्याने काँग्रेस पक्षाचे नेतेही आता त्यांच्याविषयी जास्त बोलत नसल्याचे दिसून येते.

सामान्य लोकांबरोबर तसेच कार्यकर्त्यांबरोबर भर उन्हात दिवसभर फिरून त्या आपला प्रचार करीत असल्याने एकप्रकारे विरोधकांना त्या आपल्या कामातून प्रत्युत्तर देत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com