Canacona News : विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी साथ द्या : पल्लवी धेंपे

Canacona News : यावेळी सभापती रमेश तवडकर, भाजप मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर आदी उपस्थित होते. तसेच ज्या भागात कोपरा बैठका झाल्या तेथील सरपंच,पंच उपस्थित होते.
Pallavi Dhempe
Pallavi DhempeDainik Gomantak

Canacona News :

काणकोण, भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी श्रीनिवास धेंपे यांचा सोमवारी काणकोणात झंझावाती प्रचार दौरा झाला.

त्यांनी ठिकठिकाणी कोपरा बैठका घेत विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन केले.

यावेळी सभापती रमेश तवडकर, भाजप मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर आदी उपस्थित होते. तसेच ज्या भागात कोपरा बैठका झाल्या तेथील सरपंच,पंच उपस्थित होते.

Pallavi Dhempe
Goa ECI: गोव्यात दारू, ड्रग्ज, पैसा, भेटवस्तूंची खैरात; निवडणूक आयोगाकडून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

यावेळी धेंपे यांनी आमचे घराणे सामाजिक सेवेत आहे, निवडून आल्यानंतर मडगाव व अन्य भागात संपर्क कार्यालये उघडण्यात येतील. या कार्यालयामार्फत दक्षिण गोव्यातील सर्व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सभापती रमेश तवडकर यांनी काणकोण विधानसभा मतदारसंघ स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे. हे ध्येय पूर्णत्वाकडे जाण्यासाठी पल्लवी धेंपे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.

कोपरा बैठकांना प्रतिसाद

सकाळी १०.३० च्या सुमारास आगोंद येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवालयात पूजा अर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी कोपरा बैठक झाली. त्यानंतर राजबाग तारीर येथील श्री विठ्ठल रखुमाई देवालयाच्या सभागृहात बैठक झाली. संध्याकाळी कोळसर-पैंगीण येथील श्री सातेरी देवालय सभागृहात बैठक झाली.

त्यानंतर इडदर लोलये येथे बैठक झाली. आमोणे येथील संस्कृती भवन सभागृहात मतदारांशी संवाद साधला. इंद्रावाडा- गावडोंगरी येथे बैठक झाली. रात्री ९ वाजता गुळे येथे कोपरा बैठक घेतली. या बैठकांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा धेंपे यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com