LLB Admission Scam : विद्यार्थ्यांना न्‍याय; ‘गोमन्तक’चे मानले आभार

बीए,एलएलबी प्रवेश घोळ : ‘एनएसयूआय’, ‘कारे’च्‍या विद्यार्थ्यांनी घेतली ‘गोमन्तक’ प्रतिनिधीची भेट
Goa University
Goa University Dainik Gomantak

LLB Admission Scam : बीए एलएलबी प्रवेशासंदर्भात कारे कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य साबा दा सिल्‍वा यांनी घोळ घातला होता. तो पूर्ण पुराव्‍यांसह चव्‍हाट्यावर आणल्‍याबद्दल तसेच अन्‍यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्‍याय मिळवून देण्‍यात माेलाची भूमिका बजावलेल्‍या दै. ‘गोमन्तक’वर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ‘गोमन्तक’ने हे प्रकरण लावून धरल्‍यानेच सारा प्रकार उजेडात आला, अशा प्रतिक्रिया व्‍यक्‍त होत आहेत.

आज कारे महाविद्यालयाच्‍या काही विद्यार्थ्यांनी ‘गोमन्तक’च्‍या मडगाव कार्यालयाला भेट देऊन ‘गाेमन्तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांना पुष्‍पगुच्‍छ प्रदान केला.

या प्रकरणात ‘गोमन्तक’ने जी भूमिका वठवली, ती फार मोलाची होती. त्‍यामुळेच प्राचार्य दा सिल्‍वा यांच्‍यावर निलंबनाची कारवाई झाली. त्‍यामुळे ‘गोमन्तक’चे सर्व कर्मचारी अभिनंदनास पात्र असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

‘एनएसयूआय’चे अध्‍यक्ष नौशाद चौधरी यांनी ‘गोमन्तक’ला धन्‍यवाद देऊन सांगितले,की इतर सर्व वृत्तपत्रे मूग गिळून गप्‍प बसलेली असताना एका ‘गोमन्तक’ने हे प्रकरण धसास लावले. त्‍यांनी केलेल्‍या संशोधनात्‍मक कामामुळेच या परीक्षा पद्धतीतील सर्व भानगडी उजेडात आल्‍या.

Goa University
Goa Assembly- 50 वर्ष जुन्या कल्टी नदीवरील पुलाची तातडीने दुरुस्ती करावी - देविया राणे | Gomantak TV

समाजाला न्‍याय मिळावा हे लोकशाहीला अपेक्षित आहे. हा न्‍याय मिळण्‍यासाठी वृत्तपत्रांनी चौथ्‍या स्‍तंभाची भूमिका वठविणे गरजेचे असते. ‘गोमन्तक’ने ती वठवली. मात्र दुर्दैवाने माहिती असूनही इतर वृत्तपत्रांनी या अनिष्ट गोष्‍टींकडे डोळेझाक केली, अशी खंतही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

कारे कायदा महाविद्यालयाच्‍या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्‍यक्ष ॲड. संजीत देसाई यांनीही ‘गोमंतक’चे अभिनंदन करताना शिक्षण संस्‍थांतही कशा तऱ्हेने बेकायदेशीर बाबी चालू असतात यावर ‘गोमन्तक’ने उजेड टाकला.

शिक्षण पद्धती सुधारण्‍यासाठी अशा बातम्‍या येणे गरजेचे आहे. त्यातून शिक्षण पद्धतीत सुधारणा शक्‍य आहे. ज्‍येष्‍ठ वकील ॲड. माधव बांदोडकर यांनी ‘गोमन्तक’चे अभिनंदन करताना अशा प्रवृत्तीच्‍या शिक्षकांना धडा शिकविणे गरजेचे आहे,असे सांगितले.

Goa University
Goa Assembly Monsoon Session 2023 : 40 हजार चौ. मी. जागेवर अतिक्रमण; विरोधकांचा आरोप

ते स्वतःच कायदा विसरले !

‘या’ प्राचार्यांनी यापूर्वी कायद्यावर बोट ठेवून कित्‍येक विद्यार्थ्‍यांना परीक्षेला बसण्‍यापासून वंचित ठेवले होते. मात्र, आपल्‍या मुलाचा प्रश्‍न आल्‍यावर ते स्‍वत:च कायदा विसरले,असे विवेक नाईक यांनी सांगितले.

असा कायदा विसरणाऱ्या प्राध्‍यापकांना कायद्याचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात थारा मिळता कामा नये.‘गोमन्तक’ने केलेल्‍या संशोधनात्‍मक वृत्तांतामुळे या प्राध्‍यापकाच्‍या भानगडी उघडकीस आल्‍या आणि त्‍यांच्‍यावर निलंबनाची कारवाईही झाली याचेच समाधान जास्‍त आहे, असे ते म्‍हणाले.

वास्‍तविक ‘गोमन्तक’वर ही बातमी येण्‍यापूर्वी कुणालाच या प्रकरणाची व्‍याप्‍ती माहीत नव्‍हती. आमच्‍या संघटनेलाही सुरुवातीला ‘गोमन्तक’कडूनच माहिती मिळाली. त्‍यानंतर आम्‍हीही हा प्रश्‍न लावून धरला. आपल्‍या मुलावर मेहरबानी करणाऱ्या प्राचार्याला निलंबित करा, ही आमची मागणी मान्‍य झाली याचा आनंद आहे. त्‍यांना बडतर्फ करण्‍यात यावे, ही आमची मूळ मागणी आहे.

नौशाद चौधरी, अध्यक्ष एनएसयूआय

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com