Liquor Tasting : ‘कदंब’ करणार चालकांची मद्यचाचणी; अल्कोमीटर दाखल

Liquor Tasting : पुढील आठवड्यापासून कार्यवाही
Kadamba Transport Corporation
Kadamba Transport CorporationDainik Gomantak

Liquor Tasting : पणजी, कदंब परिवहन महामंडळाने चालकांची मद्यचाचणी करण्यासाठी अल्कोमीटर आणलेले आहेत. त्याचा वापर पुढील आठवड्यापासून होणार असल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पणजी ते वाळपई घेऊन जाणाऱ्या कंदब बसचा चालकाने मद्य प्राशन केल्याचे आढळले होते. बस प्रवाशांनी कदंब पठारावर चालकाला थांबवावी लावल्यामुळे अनर्थ टळला होता. त्यानंतर कदंबाच्या बसेस अनेक चालक मद्यपान करून चालवित असल्याची चर्चा सुरू झाली.

त्यामुळे महामंडळाने चालकांची मद्यचाचणी अल्कोमीटरद्वारे करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार महामंडळाकडे अल्कोमीटर दाखल झाले आहेत, त्याचा वापर पुढील आठवड्यापासून होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Kadamba Transport Corporation
Goa Live Update 15 December 2023: नवीन झुआरी पुलावर कारचा अपघात; नियंत्रण सुटल्याने कार बॅरीकेड्सवर आदळली

अल्कोमीटरची चाचणी घेण्यात आली आहे. चालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबांना आणून चालकांना बसमधील प्रवाशांचा जीव किती महत्त्वाचा आहे, याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

यापूर्वी मद्य पिऊन बस चालविताना सापडलेले आहेत, त्यांची पहिल्यांदा चाचणी केली जाईल. सर्व बसस्थानक प्रमुखांकडे अल्कोमीटर असतील, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com