ज्येष्ठ पत्रकार व पद्मश्री लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांचे निधन

लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांचा जन्म 17 सप्टेंबर 1914 रोजी गोव्यात झाला होता मात्र त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पुणे येथे झाले.
Lambert Mascarenhas
Lambert MascarenhasDainik Gomantak

पणजी: ज्येष्ठ पत्रकार, लेखक, स्वातंत्र्य कार्यकर्ते व पद्मश्री लॅम्बर्ट मास्कारेन्हास (106) यांचे आज सकाळी त्यांच्या दोना पावल येथील निवासस्थानी निधन झाले. पत्रकारितेतील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला होता. त्यांचा गोवा मुक्तिलढ्यातही मोठा मोलाचा वाटा होता. (Journalist and Padma Shri Lambert Mascarenhas passes away)

लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांचा जन्म 17 सप्टेंबर 1914 रोजी गोव्यात झाला होता मात्र त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पुणे येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षण मुंबईतील सेंट झेव्हियर महाविद्यालयात झाले. त्यांनी मुंबईतील ‘मॉर्निंग स्टँडर्ड’ या वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांनी ‘वॉम्बे सेंटिनेल’मध्ये उपसंपादक म्हणून काम केले. काही वर्षांनी त्यांनी ‘ऑनलुकर’मध्ये सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिले. त्यांना गोवा मुक्तिलढ्याच्या काळात त्यांनी ‘गोवा ट्रिब्युन’ सुरू केले. त्यामुळे त्याचा फायदा गोवा मुक्तिलढ्यावेळी झाला. मध्ये 1964 गोवा मुक्त झाल्यानंतर ते ‘द नवहिंद टाईम्स’ या इंग्रजी दैनिकाचे ते संपाद म्हणून रूजू झाले. त्यानंतर त्यांनी ‘गोवा टुडे’चे संपादन केले. त्यांचा पत्रकारितेतील अनुभव मोठा होता. त्यांचा स्वभाव शांत व मनमिळाऊ असल्याने त्यांना पत्रकार क्षेत्राबरोबर समाजामध्ये मोठा आदर होता.

पत्रकारितेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांना 2004 साली लक्ष्मीदास मेमोरिअल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. गोव्यातील सर्वाधिक मानांकित असा गोमंत विभूषण पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. 2015 मध्ये केंद्र सरकारने त्यांनापद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com