शॅकवाटप धोरण निश्‍चित करणे गरजेचे : आरोलकर

मांद्रे मतदारसंघातील काही किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा नाहीत. स्‍वच्‍छतागृह, शौचालय, चेंजिंग रुम अशा सुविधांची वानवा आहे.
FIR filed against Jeet Arolkar for malpractice
FIR filed against Jeet Arolkar for malpracticeDainik Gomantak

पणजी: मांद्रे मतदारसंघातील काही किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा नाहीत. स्‍वच्‍छतागृह, शौचालय, चेंजिंग रुम अशा सुविधांची वानवा आहे. पुढील पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी सरकारने येथील किनाऱ्यांवर आवश्‍यक त्‍या सुविधा उभाराव्‍यात असे सांगून शॅक वाटपाचे निश्‍चित धोरण ठरवावे, अशी मागणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केली.

(Jeet Arolkar's demand to fix shack allocation policy)

FIR filed against Jeet Arolkar for malpractice
राज्यातील ‘ॲप आधारित टॅक्सीबाबत विश्‍वासात घ्या’

पर्यटन खात्‍याच्‍या कपात सूचनांवर आरोलकर बोलत होते. पर्यटन खात्‍याच्‍या जमिनींवर काहींनी अतिक्रमण केले आहे. खात्‍याने याची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. तसेच शॅक वाटपाचे निश्‍चित धोरण ठरवावे.

कारण किनाऱ्यांवर शॅक वितरण करताना स्‍थानिकांना प्राधान्‍य देणे आवश्‍यक आहे. बऱ्याचदा एकाच कुटुंबातील चार-चार लोक विविध किनाऱ्यांवर शॅक घालण्यासाठी अर्ज करतात. या लोकांना शॅकचे वितरण होते. पण केवळ एका शॅकसाठी अर्ज केलेल्‍यांना तो मिळत नाही. तसेच स्‍थानिकांना डावलून अन्‍य गावांतील व्‍यक्‍तींना शॅकचे वाटप केले जाते. शॅकच्‍या माध्यमातून स्‍थानिकांना रोजगार मिळणे आवश्‍यक आहे. यात पर्यटनमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि शॅक धोरणात बदल करावा, अशी सूचना जीत आरोलकर यांनी केली.

FIR filed against Jeet Arolkar for malpractice
राज्य सरकारचा क्रीडा संघटनांना ‘दे धक्का’

पर्यटन खात्‍याच्‍या वतीने देण्यात येणारे परवाने प्रत्‍यक्ष जागेवर भेट न देताच दिले जातात. स्‍थानिक पंचायत, आरोग्‍य, प्रदूषण नियंत्रण आदी विभागांचे ना-हरकत दाखले पाहून पर्यटन खाते परवानगी देते. पर्यटन अधिकाऱ्यांनी प्रत्‍यक्ष ठिकाणी भेट देऊन तसेच तपासणी करून परवाने द्यावेत, अशी सूचना आरोलकर यांनी केली.

तुये इलेक्‍ट्रॉनिक सिटी मार्गी लावा

तुये येथील नियोजित इलेक्‍ट्रॉनिक सिटीचे काम लवकर पूर्ण करावे. यामुळे स्‍थानिकांना नोकऱ्या उपलब्‍ध होतील. प्रकल्‍प जमिनीत काही लोक कूळ म्‍हणून राहत होते. पैकी काहींच्‍या ताब्‍यात जमीन होती, पण संबंधित कागदपत्रांवर त्‍यांची नावे नसल्‍याने त्‍यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही, असे आरोलकर म्‍हणाले.

पेडणेत तातडीने रवींद्र भवन उभारा

पेडणे तालुका ही कलाकारांची खाण मानली जाते. पण येथील रवींद्र भवनचा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही. जागेअभावी हा प्रश्‍न रखडला आहे. तुये येथे महसूल खात्‍याची सुमारे अडीच लाख चौरस मीटर जागा असून तेथे भव्‍य रवींद्र भवन उभारणे शक्‍य आहे. पेडणे तालुक्‍यातील कलाकारांना अधिक संधी मिळावी यासाठी सरकारने तातडीने रवींद्र भवन उभारावे, अशी मागणी आरोलकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com