Goa Accident: मागील 3 वर्षात गोव्यात तब्बल 12 हजारांहून अधिक अपघातांची नोंद, तर दंडापोटी जमा झाली 'एवढी' रक्कम

गोव्यात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
Goa Traffic Police
Goa Traffic PoliceDainik Gomantak

गोव्यात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नुकतीच 2019 ते 13 मार्च 2023 पर्यंत झालेल्या अपघातांची आकडेवारी समोर आली आहे.

2019 ते मार्च 2023 या कालावधीत गोव्यात तब्बल 12,308 अपघात नोंदवले गेलेय. बेशिस्तपणे वाहन चालवणे, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणे, खराब रस्ते, अंदाज न येणारे गतिरोधक अशा अनेक कारणास्तव अपघातांची संख्या वाढत आहे.

2019 ते मार्च 2023 पर्यंत जे 12,308 अपघात झाले यात 1050 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तर या अपघात प्रकरणांमध्ये 30,16,501 दंड ठोठावण्यात आल्याची नोंद झाली आहे.

गोवा वाहतूक पोलीस आपली कार्यतत्परता दाखवत वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत आहेत.

तसेच पणजी, पर्वरी येथे वाहतूक नियंत्रणासाठी cctv कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. थोडक्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस सतर्क आहेत

Goa Traffic Police
Goa Women's Premier League: स्पर्धेला आजपासून पर्वरीत सुरवात, शिखासह प्रमुख खेळाडूंचे आकर्षण

अपघातांची कारणे:-

  • वेगमर्यादेचे पालन न करणे

  • वाहनांना ओव्हरटेक करणे

  • रस्त्यावरील धोकादायक वळणे

  • रस्त्याच्या बाजूने वाढलेली

  • झाडेझुडपे

  • वाहन चालविताना

  • मोबाईलचा वापर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com