Illegal Constructions : कथित बेकायदा बांधकामांची तक्रार केली कोणी ? हरमल सरपंच धारेवर

Illegal Constructions : पंचायत आर्थिक विवंचनेत, विकासकामे राबवण्यास निधी नाही
Illegal Constructions
Illegal ConstructionsDainik Gomantak

Illegal Constructions : हरमल, गिरकरवाडा येथील कथित बेकायदा बांधकामांची तक्रार कोणी केली, त्याचा परिणाम संपूर्ण वड्यावरील लोकांना भोगावा लागला. सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांनी कोणत्या आधारावर १८७ कमर्शिअल आस्थापने अवैध ठरवली,

त्यासाठी तक्रारी आल्या होत्या किंवा ठराव घेतले होते का, कमर्शिअल इमारती कोणत्या निकषांवर अवैध ठरवल्या, याबाबतची माहिती सरपंच फर्नांडिस यांनी द्यावी, असा आग्रह प्रभाग चारमधील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला.

सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी सरपंच व सचिवाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. १८७ आस्थापनाबाबत सरपंचांनी वैयक्तीक जबाबदारीवर प्रतिज्ञापत्र दिले, त्यास अन्य पंच मंडळी जबाबदार नाहीत.

स्वतःचे बांधकाम वाचवण्यासाठी सरपंचाने हे प्रतिज्ञापत्र दिले व संपूर्ण गावाला त्रासात लोटले, असे माजी सरपंच इनसियो डिसोझा यांनी सांगितले. ही ग्रामसभा दोन वेळा रोखली होती. दरम्यान, सरपंचांनी आपण प्रभागातील ग्रामस्थांसमवेत असून आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले व प्रश्नावर पडदा पाडला.

दरम्यान, पंचायत आर्थिक विवंचनेत असून विकासकामे राबवण्यासाठी निधी नाही. आपण ताबा घेतला त्यावेळी पंचायत ३१ लाख रुपये तोट्यात होती, सध्या ही तूट कमी झाली आहे, अशी माहिती सचिव सचिन धावस्कर यांनी यावेळी दिली. यावर झालेल्या चर्चेत मागील पंचायत मंडळ व तत्कालीन सचिवाने मनमानी व गैरप्रकार केल्याने त्यांच्या विरोधात दक्षता खात्याकडे तक्रार करण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला.

यावेळी उपसरपंच अनुपमा मयेकर, पंच सोनाली माज्जी, सांतान फर्नांडिस, सुशांत गावडे, दिव्या गडेकर, गुणाजी ठाकूर, रजनी इब्रामुपुरकर तसेच निरीक्षक म्हणून गट विकास कार्यालयाचे बाबू किनळेकर उपस्थित होते. प्रारंभी सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांनी स्वागत केले. सचिव सचिन धवस्कर यांनी मागील सभेचा वृत्तान्त वाचून दाखवला.

सरपंच फर्नांडिस यांनी आभार मानले. प्रमेष मयेकर, अशोक इब्रामपुरकर, महेश वायगंणकर, गुरुदास नानोस्कर, संजय नाईक, टोनी डिमेलो, मर्सेलिन फर्नांडिस, माजी सरपंच इनासियो डिसोझा, माजी पंच बाबुश फर्नांडिस, आयरिश डिसोझा, राफायल फर्नांडिस, डॉमनिक फर्नांडिस, बॉस्को फर्नांडिस, संतान फर्नांडिस आदींनी चर्चेत भाग घेतला.

किनारी भागात तिघांकडून पैसे गोळा...!

किनारी भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असून लमाणी, भिकारी व फिरते विक्रेते याबाबत ग्रामस्थांनी प्रश्‍न उपस्थित केला असता किनारी भागात पोलिस, पर्यटन व सोपो वसुली कंत्राटदार मिळून तिघांकडून पैसे गोळा केले जात असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.

त्यावेळी सोपो कर पंचायत वसुल करते तर अन्य दोघे कोणासाठी पैसे गोळा करतात असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला. पंचायत मंडळाने फिरत्या विक्रेत्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली असल्याचे सरपंच फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.

Illegal Constructions
Goa Traffic Police: 4.39 लाख चालकांना दंड, 25.65 कोटींचा महसूल जमा

म्हणून पंचायतीचा महसूल बुडाला !

पर्यटन हंगामात विविध आस्थापनांना पंचायत ना हरकत दाखला देत असते, मात्र यंदा दाखला घेण्यासाठी पंचायतीने आस्थापन इमारतीचा फोटो, घरपट्टी शुल्क, आधार कार्ड आदींची सक्ती केल्याने पंचायतीचा महसूल बुडाल्याचे ग्रामस्थ मार्सेलिन फर्नांडिस यांनी निदर्शनास आणून दिले. पंचायतच स्वतःचा महसूल कमी करीत असून केवळ आधारकार्ड व घरपट्टी शुल्क असल्यास ना हरकत दाखला द्यावा, असा ठराव मंजूर केला.

करार करा...

पंचायतीने भटक्या गुरांवर कारवाई करण्याआधी गोशाळेशी करार करणे आवश्यक आहे. रस्त्यावर अपघात होत असल्याने पाळीव गुरांनाही उचलून नेण्यात आले, यामुळे गुरांच्या मालकांना नाहक भुर्दंड सोसावा लागला, असे नागरिक महेश वायगंणकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com