‘आयडीसी-कनेक्ट’चा उद्योगांवर सकारात्मक परिणाम : मंत्री माविन गुदिन्हो

सांकवाळ येथे बैठक
Mauvin Godinho
Mauvin GodinhoDainik Gomantak

राज्यातील उद्योगाशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीला प्रोत्साहन देणे, सेवा सुलभता वाढवणे आणि समस्या-तक्रार निवारण करणे या उद्देशाने गोवा औद्योगिक विकास महामंडळ (गोवा-आयडीसी) ने आयडीसी-कनेक्ट हा उपक्रम सुरू केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम उद्योगांवर झाला आहे,असे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

‘आयडीसी-कनेक्ट’ उपक्रमातून आयडीसीच्या प्रमुख विभागांचे पदाधिकारी यांची सांकवाळ औद्योगिक वसाहतीत बैठक पार पडली.त्यावेळी मंत्री गुदिन्हो

Mauvin Godinho
Goa IPL Betting Racket: आयपीएल सामन्यांवर बेटिंग; पैशांचा खेळ; 13 जणांना अटक

केंद्र व राज्यस्तरीय योजनांचा लाभ विशेष करून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) जास्तीत जास्त करून देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. बैठकीत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देणे या दोन महत्वाच्या मुद्द्यावर ऊहापोह करण्यात आला. गोव्यातील विविध औद्योगिक वसाहतींत अशा बैठका आयोजणे हा आयडीसी-कनेक्टचा एक भाग आहे.

रिझर्व्ह बॅंकही ‘कनेक्ट’मध्ये

गोवा आर्थिक विकास महामंडळ (जीईडीसी), गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (जीआयपीबी), गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (जीएसपीसीबी), कारखाने आणि बाष्पक विभाग (एफ अँड बी), वीज खाते आदी विभागही आयडीसी-कनेक्ट उपक्रमात आमच्यासमवेत सहभागी झाले आहेत.

Mauvin Godinho
Sattari : पूर प्रतिबंधक उपायांकडे सरकारचे लक्ष : आमदार डॉ. दिव्या राणे

वसाहतीतील उद्योगांच्या समस्यांचे निवारण करणे व सेवा उपलब्ध करण्याचे काम विविध खाती या उपक्रमातून करत आहेत. रिझर्व्ह बँकही या उपक्रमात सहभागी झाली आहे,अशी माहिती सीईओ अभिषेक यांनी दिली.

"औद्योगिक पायाभूत सुविधांबरोबरच विविध उद्योग समस्यांचे निराकरण करण्यास सरकार गंभीरतेने व सकारात्मकपणे पाहत आहे. त्याचबरोबर उद्योगांकडून सकारात्मक परिणामांची अपेक्षा सरकारला आहे. यातूनच प्रगती शक्य आहे."

आलेक्स रेजिनाल्ड, अध्यक्ष, गोवा आयडीसी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com