‘मीच माता, मीच पिता’

old mother want help
old mother want help

पणजी,

‘मीच माता, मीच पिता’ ही उक्‍ती प्रत्‍यक्षात उतरविण्याचे धाडस नेत्रावळी येथील भाग्‍यती प्रभुदेसाई यांनी दाखविले आहे. आपल्‍या दोन विशेष मुलांचे गेली ३५ वर्षे संगोपन करतानाच अनेक वेळा पित्‍याची भूमिकाही त्‍यांनी वठविली आहे. पित्‍याचे छत्र नाही, हे त्‍यांनी कधीच आपल्‍या मुलांना सांभाळताना जाणवू दिले नाही. वयाची ८० वर्षे काढताना त्‍यांनी माता आणि पित्‍याचे रूप एकाच ठायी मुलांना अपार प्रेम दिले आहे.
भाग्‍यती यांची मुले संदीप आणि संतोष ३० वर्षांपूर्वी धडधाकट होती. मात्र कालांतरांने त्‍यांच्‍या शरीराचे अवयव काम करण्‍याची क्षमता गमवू लागले. त्‍यांच्‍या नवऱ्याचेही काही वर्षापूर्वी निधन झाल्‍याने आपल्‍या मुलांना जगविण्‍यासाठी त्‍यांनी कंबर कसली. मात्र आता या माऊलीचे वय झाले आहे. तिचे शरीर थकल्‍याने तिच्‍याकरवी या मुलांची सेवा करणे होत नाही. प्रत्‍येक कामासाठी मुलांना उचलणे आता तिला शक्‍य होत नसल्‍याने आम्‍हा तिघांची सोय एखाद्या आश्रमात करावी, आमच्‍या मदतीसाठी एक मदतनीस देण्‍याची विनंती ही माऊली करते.
काही दिवसांपूर्वी त्‍यांच्‍या घराचे छतही पावसामुळे पडले होते. शिवाय त्‍यांची दोन्‍ही मुले वारंवार आजारी असतात, मात्र कोणीही त्‍यांना तपासण्‍यासाठी येत नसल्‍याचे ही आई सांगते. मला पैसा नको केवळ मदत हवी आहे. आजवर शरीरात ताकद होती, तोपर्यंत मी माझ्‍या मुलांची सेवा केली आहे, मात्र आता माझेही शरीर थकत आहे, त्‍यामुळे त्‍यांना अंघोळ घालणे, स्‍वच्‍छता अशी कामे मला जमत नाहीत, अशा कामांसाठी कोणी इच्‍छुक असल्‍यास किंवा अशाप्रकारची सेवा कोणी देत असल्‍यास कळविण्‍याची विनंती ही माऊली करीत आहे.

दिग्विजीत चव्‍हाण यांनी उचलली जबाबदारी
या कुटुंबाबद्दल मडगावचे दिग्विजीत चव्‍हाण यांना समजल्‍यानंतर त्‍यांनी या कुटुंबाकडे धाव घेतली आणि आर्थिक मदत करण्‍यासाठीची इच्‍छा व्‍यक्‍त केली असता आर्थिक मदत त्‍यांनी नाकारली. या आईला मानसिक आणि तिच्‍या मुलांना सांभाळण्‍यासाठी शारीरिक मदत हवी आहे. सध्‍या श्री. चव्हाण त्‍यांच्‍या घरी जाताना खाण्‍यापिण्‍यासाठी लागणारे साहित्‍य पुरवत आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com