Shripad Naik : श्रीपाद नाईक यांच्या तेलंगणातील प्रचार सभेला प्रचंड प्रतिसाद

आज तेलंगणातील भाग्यनगर मलकपेट जिल्ह्यातील यकुतपुरा विधानसभा मतदारसंघात भापजचे उमेदवार विरेंद्र यादव यांच्या प्रचार सभेत सहभागी होऊन मतदारांना मार्गदर्शन केले.
Shripad Naik
Shripad Naik Dainik Gomantak

Shripad Naik : पणजी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज तेलंगणातील भाग्यनगर मलकपेट जिल्ह्यातील यकुतपुरा विधानसभा मतदारसंघात भापजचे उमेदवार विरेंद्र यादव यांच्या प्रचार सभेत सहभागी होऊन मतदारांना मार्गदर्शन केले.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आज (गुरुवारी) सकाळी हैदराबादमध्ये दाखल झाले. भाग्यनगर मलकपेट भाजपा जिल्हा अध्यक्ष सामरेड्डी सुरेंद्र रेड्डी यांनी हैदराबादच्या आरजीआय विमानतळावर नाईक यांचे स्वागत केले.

विजयनगर येथील श्री गणेश मंदिराला भेट देऊन नाईक यांनी यकुतपुराचे उमेदवार विरेंद्र यादव यांच्यासह देवदर्शन घेतले आणि प्रचार मिरवणुकीत सामील झाले. भाग्यनगर मलकपेट भाजपा जिल्हा अध्यक्ष सामरेड्डी सुरेंद्र रेड्डी यांच्यासह अनेक स्थानिक भाजप नेते आणि कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले.

Shripad Naik
Shripad Naik - मरीना प्रकल्पाची गोव्याला गरज - श्रीपाद नाईक | Gomantak TV

प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या भव्य प्रचार मिरवणुकीत नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ‘भारत माता की जय’ या घोषणांनी वातावरण भारले गेले. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात युवा-युवतींनी भाग घेतला. मिरवणुकीच्या मार्गावर फुल-पाकळ्यांची उधळण होत होती.

देशाचा प्रत्येक नागरिक, शेवटच्या पायरीवरील व्यक्ती सुखी असावी, कुणी उपाशी पोटी राहू नये, त्याला मूलभूत सुविधा मिळाव्यात, देशात शांतता नांदावी, यासाठी पंतप्रधान कटिबद्ध आहेत, असे नाईक म्हणाले.

केंद्रीय मंत्री नाईक यांनी त्यानंतर नामपल्ली, हैदराबाद येथील भाजपा कार्यलयाला भेट देऊन भाजपा नेते आणि कार्यकर्यांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले. संध्याकाळी केंद्रीय मंत्री नाईक यांनी भाजपा जिल्हा अध्यक्ष (हैदराबाद) डॉ. एन. गौथम व अन्य स्थानिक भाजपा नेत्यांसह पत्रकार परिषदेला संबोधित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com