वीज सवलत घोटाळा प्रकरणाची सुनावणी शनिवार पर्यंत तहकूब

पंचायत मंत्री मॉविन गुदीन्होहे मुख्य आरोपी असलेल्या 5.50 कोटींच्या वीज बिल सवलत घोटाळ्याची सुनावणी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी शनिवारपर्यंत तहकूब केली.
Mavin Gudinho
Mavin GudinhoDainik Gomantak

मडगाव : पंचायत मंत्री मॉविन गुदीन्होहे मुख्य आरोपी असलेल्या 5.50 कोटींच्या वीज बिल सवलत घोटाळ्याची सुनावणी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी शनिवारपर्यंत तहकूब केली.

Mavin Gudinho
भाजपने ओबीसींना परत एकदा डावलले - युरी आलेमाव

या प्रकरणात दाखल केलेले आरोपपत्र सदोष असून त्यामुळे आपल्याला दोषमुक्त करावे अशी मागणी गुदीन्हो यांनी केली असून ते सिद्ध करण्यासाठी क्राईम ब्रँचची पोलीस डायरी न्यायालयात सादर करावी अशी मागणी करणारा अर्ज गुदीन्हो यांच्यावतीने न्यायालयात सादर केला होता. आज सरकारी वकील त्यावर आपले म्हणणे मांडणार होते. मात्र सरकारी वकील न्यायालयात आज नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

गुदीन्हो हे काँग्रेस सरकारात विजमंत्री असताना त्यांनी वीज खात्याच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून काही कंपन्यांना बेकायदेशीर मार्गाने वीज बिलात सवलत दिल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांच्यासह वीज खात्याचे निवृत्त अधिकारी आणि सवलत मिळालेल्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलमाखाली गुन्हे नोंद केले होते. मात्र खालच्या न्यायालयाला अशी प्रकरणे हाताळण्याचा अधिकार नसल्याचा दावा करून हे आरोपपत्र रद्द करावे अशी मागणी सर्व संशयितांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com