Harmal News : ‘सावतामाळी’ नाटकाने पटकावले प्रथम पारितोषिक; हरमल येथे स्‍पर्धा

Harmal News : ‘काहीतरी घडतंय इथं’ द्वितीय, ‘प्रीतिसंगम’ला तृतीय बक्षीस
Harmal
Harmal Dainik Gomantak

Harmal News :

हरमल, येथील दूर्वांकुर कला केंद्र आयोजित सातव्या हरमल ग्राममर्यादित नाट्यस्पर्धेत वस्तवाडा येथील श्री राष्ट्रोळी कलावर्धिनीतर्फे सादर सं. ‘सावतामाळी’ या नाटकास प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले.

‘काही तरी घडतंय इथं’ (श्री गावडेश्‍‍वर नाट्यमंडळ, मधलावाडा) या नाटकाला द्वितीय तर ‘प्रीतिसंगम’ (श्री रवळनाथ नाट्यमंडळ) या नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

स्‍पर्धेत एकूण अकरा नाट्यमंडळांनी सहभाग घेतला होता. ‘आशीर्वाद’ (कामाक्षी नाट्यवृंद) व ‘ती एक पावनखिंड’ (श्री रवळनाथ हौशी नाट्यमंडळ) या नाटकांना उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्‍त झाली. परीक्षकांकडून आत्माराम कोरखणकर (तुक्या) या व्यक्तिरेखेला खास बक्षीस देण्यात आले. विजेत्यांना पथकांना रोख बक्षिसे व आकर्षक स्मृतिचिन्ह देण्यात आली.

Harmal
Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

सदर स्पर्धा जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, मांद्रेचे माजी सरपंच व विद्यमान पंच ॲड. अमित सावंत व हरसन पेट्रोलियमचे प्रोपा रजत हरमलकर यांनी पुरस्‍कृत केली होती. स्पर्धेचे परीक्षण सोमनाथ पार्सेकर व हरीश शेटगावकर यांनी केले.

बक्षीस वितरण समारंभास ॲड. अमित सावंत, हरमल सरपंच रजनी इब्रामपूरकर, परीक्षक, संस्थेचे अध्यक्ष चंद्रहास दाभोलकर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सचिव अर्जुन गडेकर यांनी तर बक्षीस वितरण निवेदन शशिकांत कोरखणकर यांनी करून शेवटी त्‍यांनीच आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com