Harmal Deepotsav : कोरखणवाड्याच्या एकजुटीचा आदर्श घ्यावा : आमदार जीत आरोलकर

Harmal Deepotsav : ‘हरमल दीपोत्सव’ उत्साहात; विविध स्पर्धांना प्रतिसाद
Harmal Deepotsav  MLA Jeet Arolkar
Harmal Deepotsav MLA Jeet ArolkarDainik Gomantak

Harmal Deepotsav : हरमल, दीपावली हा अंधकार दूर करणारा उत्सव आहे, त्यामुळे कोरकणवाड्यावर साजरा होणारा प्रत्येक सण, उत्सव हा आगळावेगळा असतो,त्यामुळे येथे उपस्थित राहताना आनंद असतो.

एकजूट हा महत्वाचा घटक असून सामंजस्याने एकी कशी टिकवून ठेवावी,हा समाजातील प्रत्येक घटकाने येथून बोध घ्यावा,असे आवाहन मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केले.

कोरखणवाडा श्री राष्ट्रोळी देवस्थानच्या प्रांगणात, वाड्यावरील ग्रामस्थांतर्फे आयोजित दीपोत्सवानिमित्त पाककला,रांगोळी व आकाशकंदील स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

संस्कृती टिकवण्यासाठी सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न केले पाहिजेत.''उदरगत'' संस्थेने, पार्से खाजन गुंडो ठिकाणी अश्याच स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून ग्रामस्थांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

Harmal Deepotsav  MLA Jeet Arolkar
Ashadhi Ekadashi - साखळी येथील प्रोग्रेस हायस्कूलतर्फे आषाढी एकादशी साजरी | GomantakT V

कुळ व मुंडकारांचा उल्लेख झाला,त्या अनुषंगाने ह्या वाड्यावरील लोकांनी आपल्या कार्यालयात संपर्क करून आवश्यक सोपस्कार पूर्ण करावेत, असे आवाहन आमदार जीत आरोलकर यांनी केले. अरुण बांधकर, सुशांत गावडे, राजन बांधकर, ज्ञानेश्वर कोरखणकर,मनोज कोरखणकर,प्रतीक कोरखणकर, परीक्षक साईदास नाईक, साईश चारी उपस्थित होते.

आमदार जीत आरोलकर यांनी झोनिंग प्लान रद्द केल्यानंतर कुळ मूंडकारांच्या हितासाठी अतिशय योग्य पाऊल उचलले आहे.

-संतोष कोरखणकर, सामाजिक कार्यकर्ते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com