Harmal News : पालये-भोम ते हरमल कॉलेज रस्ता रुंदीकरण कामास प्रारंभ

Harmal News : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कामास मंजुरी दिल्याबद्दल आमदार आरोलकर यांनी त्यांचे आभार मानले.
Harmal
Harmal Dainik Gomantak

Harmal News :

हरमल, पालये-भोम ते हरमल पार्सेकर सॉ मिलपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

यावेळी पालयेच्या सरपंच स्नेहा गवंडी, हरमलच्या सरपंच रजनी इब्रामपूरकर, उपसरपंच अनुपमा मयेकर, पंच दिव्या गडेकर, सुशांत गावडे, सांतान फर्नांडिस, भिकाजी नाईक, पालयेच्या पंच राधा परब, रंजना परब, सागर तिळवे, संदीप न्हानजी आदी उपस्थित होते.

या रस्त्याच्या कामास बराच विलंब झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. या कामासाठी सुमारे १ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कामास मंजुरी दिल्याबद्दल आमदार आरोलकर यांनी त्यांचे आभार मानले.

Harmal
Goa Politics: दक्षिणेतील उमेदवारीचा निर्णय दोन दिवसांत

यावेळी सागर तिळवे, रजनी इब्रामपूरकर, स्नेहा गवंडी यांनीही मनोगत व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता शिवनाथ गवस, अर्जुन तिळवे, शांती तिळवे, लाडजी नाईक, तुकाराम तारी, हरेश मयेकर, रमेश गावडे, प्रदीप वस्त, प्रजॉय फर्नांडिस आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com