Govind Gaude : बहुजन नेत्याला लक्ष्य नको

उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांची मागणी
Govind Gaude
Govind Gaude Dainik Gomantak

43 वर्षांपूर्वी बांधलेल्या कला अकादमी खुल्या रंगमंचाचे छत कोसळले, ही वाईट घटना असली, तरी केवळ बहुजन समाजाचे नेते म्हणून कला संस्कृती मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांना विरोधकांनी लक्ष्य करू नये, असे ‘उटा’ संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आश्र्वासन दिले असताना व चौकशी न होताच मंत्री गावडे यांना घटनेस जबाबदार धरणे योग्य नव्हे, असे सांगून वेळीप म्हणाले, उटा संघटना मंत्री गावडे यांच्या पाठीशी आहे.

गावडे यांना केवळ वैयक्तिक मत्सर व हेवा पोटी लक्ष्य केले जात असल्याचा आपल्याला संशय असल्याचेही वेळीप यांनी सांगितले.

कला अकादमीचे छत कोसळण्याला मंत्री गावडे यांचा काहीही संबंध नाही. जे छत कोसळले ते जुने असून सध्या या भागाचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केले जात आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे.

Govind Gaude
Goa Petrol-Diesel Price: 427 दिवसांत इंधन दरात मोठा बदल नाही, गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव जाणून घ्या

या सर्व प्रकारातून उटा संघटनेच्या चळवळीस अपशकून करण्याचा कोणी प्रयत्न तर करीत नाही ना? असा संशय येऊ लागला आहे. विधानसभेत विरोधकांनी सभापती समोर घोषणा फलक आणले, हा चुकीचा पायंडा पाडला, असेही वेळीप यांनी स्पष्ट केले.

बिनबुडाचे आरोप

मंत्री गोविंद गावडे यांना कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळलेल्या घटनेबाबत दोषी ठरवत विरोधी पक्षातील आमदार त्यांचा राजीनामा मागत आहे.

परंतु त्या कामात त्यांचा कसलाच सहभाग नसताना त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप लावले जात असून बहुजन समाज हे खपवून घेणार नाही, असे बहुजन महासंघाचे पदाधिकारी सतीश कोरगावकर यांनी सांगितले.

ते इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महासंघाचे चंद्रकांत चोडणकर, विजय केळुस्कर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com