Parra News : केरी हायस्कूलला लोककलेचे जेतेपद

Parra News : भुवनेश्‍वर, ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत होणार सहभागी
Government High school, Keri
Government High school, KeriDainik Gomantak

Parra News : पर्ये, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी)तर्फे आयोजित राज्य पातळीवरील लोकनृत्य स्पर्धेत सरकारी माध्यमिक विद्यालय केरी सत्तरीच्या गटाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले आहे.

फुगडी या कला प्रकारात यांनी हे यश प्राप्त केले. आता हा संघ भुवनेश्वर ओरिसा येथे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय लोककला नृत्य स्पर्धेत सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी याच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कला प्रकारात विजेतेपद पटकावून दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. या यशामुळे पालक, शिक्षकवर्ग तसेच नागरिकांकडून कौतुक होत आहे.

लोककला शिक्षिका जानकी परब यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने ही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

यात हर्षदा रामकृष्ण गावस, चैताली रामचंद्र परब, समृद्धी पाटील, सानिया संदेश गावस, पृथ्वी योगेंद्र पडवळकर व प्रांजल प्रशांत मोरजकर या विद्यार्थ्यांचा या गटात समावेश होता.मुख्याध्यापक श्रीकृष्ण नाईक व कार्यक्रम प्रमुख शिक्षिका स्वाती काकतकर यांचेमार्गदर्शन लाभले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com