Salcete News: आरोग्य क्षेत्रात सरकारचा निष्काळजीपणा : सरदेसाई

Vijai Sardesai: पावसाळ्यात हा नाला कोसळलेला होता व ग्रामस्थांनी तो दुरुस्त करण्याची विनंती केली होती म्हणूनच काम हातात घेतले गेले,
Salcete citizens
Salcete citizensDainik Gomantak

Vijai Sardesai: सासष्टी, मडगावमधील आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचा दर्जा वाढविण्यासाठी किंवा आयसीयू विभाग सुरू करण्यासाठी व तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी सरकारतर्फे काहीच हालचाल केलेली दिसत नाही.

काही दिवस वाट पाहून आरोग्य क्षेत्रातील सरकारी निष्काळजीपणामुळे न्यायालयात जावे लागेल, असे फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांनी गुरुवारी (ता.५) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बो्डा येथील प्रभाग ९ मधील नाल्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी सरदेसाई बोलत होते. या नाल्याचे काम १५.७८ लाख रुपये खर्चून एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे सरदेसाई यांनी सांगितले.

पावसाळ्यात हा नाला कोसळलेला होता व ग्रामस्थांनी तो दुरुस्त करण्याची विनंती केली होती म्हणूनच काम हातात घेतले गेले, असे स्थानिक नगरसेवक राजू नाईक यांनी सांगितले.

न्यायालयात गेल्याशिवाय कुठलेच प्रश्र्न सुटत नसल्याचे दिसत आहे. घाऊक व किरकोळ मासळी मार्केटचे प्रश्र्नही न्यायालयात आहेत. महाराष्ट्रामध्येही आरोग्य क्षेत्रातील निष्काळजीपणाची न्यायालयाने दखल घेतली आहे. गोव्यातही न्यायालयातच धाव घ्यावी लागणार, असे वाटते.

- विजय सरदेसाई, आमदार, फातोर्डा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com