CM Pramod Sawant: पेडणे शासकीय इमारतीची दुरवस्था

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी : नवीन इमारत बांधण्याचे आश्‍वासन
Pernem Government Building
Pernem Government BuildingDainik Gomantak

CM Pramod Sawant: गॅलरीमध्ये ठेवलेले भंगार साहित्य, त्याच्यामागे सरकारी वाहनांचा स्क्रॅप अड्डा अशा स्थितीत एका बाजूने पेडणे शहरातील सरकारी प्रशासकीय इमारत उभी आहे. तर दुसऱ्या बाजूने सरकारच्या विविध खात्यांचे याच इमारतीमध्ये विभाग आहेत.

त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करताना अनेक अडचणी येतात. या अडचणींची माहिती नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली.

यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, मामलेदार अनंत मळीक, पेडणे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी या इमारतीची पाहणी करून कामगारांची अडचण लक्षात घेतली.

लवकरात लवकर स्थलांतरित नवी इमारत उभारावी अशी मागणी काही नागरिकांनी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या इमारतीची पाहणी केली आणि यावर योग्य ती उपाययोजना करून नवीन इमारत उभारण्याचेही आश्वासन दिले.

Pernem Government Building
Goa Crime News - खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना अटक | Gomantak TV

या इमारतीमध्ये त्या-त्या विभागातील कार्यालयांसाठी जागा अपुरी पडत आहे. त्याच अनुषंगाने आमदार आर्लेकर व आरोलकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून पेडणे शहरासाठी सुसज्ज इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करावेत.

सरकारी जागेतच प्रशस्त इमारत उभारून विविध खात्यांच्या कर्मचाऱ्यांना व कार्यालयासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

Pernem Government Building
Goa News - अभयारण्य, तसेच धबधब्यांवर जाण्यास सरकारने बंदी घातली | Gomantak TV

प्रशस्त जागा

पेडणे शहरात सार्वजनिक बांधकाम खाते पाणी विभाग यांच्या ताब्यात सरकारची एकूण ९ हजार ८०० चौरस मीटर जागा तर त्याला जोडूनच वीज विभाग यांच्याकडे एकूण ५ हजार ९०० चौरस मीटर जागा आहे.

आणि या दोन्ही जागा मिळून १६ हजारपेक्षा जास्त चौरस मीटर जमीन आहे. या जमिनीत हा प्रकल्प उभारल्यास सरकारी कार्यालयांना प्रशस्त जागा मिळेल.

Pernem Government Building
Goa News - जीवाला धोका निर्माण करणारी झाडे तोडावीत - स्थानिक | Gomantak TV

पेडणेत सर्व सोयीसुविधायुक्त आधुनिक आणि चांगल्या पायाभूत सुविधांसह प्रशासकीय इमारत असणे आवश्यक आहे. सरकारने सार्वजनिक व्यवहारांशी संबंधित नसलेली काही कार्यालये स्थलांतरित करून आता आहे त्याच इमारतीच्या जागी नवीन इमारत उभारावी.

- सीताराम परब, सरपंच, विर्नोडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com