Gomantak Swasthyam Quiz 2023: साहिल गवस ठरला गोल्ड मेडलचा मानकरी

स्पर्धेस राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद : ‘स्वास्थ्यम प्रश्‍नमंजूषा’चा निकाल जाहीर
Gomantak Swasthyam
Gomantak SwasthyamDainik Gomantak

गोमन्तक वृत्तसेवा

Gomantak Swasthyam Quiz 2023 : ‘गोमन्तक’ समूहातर्फे राबविल्या गेलेल्या अभिनव ‘स्वास्थ्यम प्रश्‍नमंजूषा २०२३’ स्पर्धेचा निकाल गुरूवारी (ता. २०) ‘गोमन्तक’ कार्यालयात शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, ‘गोमन्तक’चे मुख्य व्यवस्थापक (व्यवसाय प्रशासन) सचिन पोवार, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अरूण पाटील यांच्या हस्ते लकी ड्रॉच्या माध्यमातून काढण्यात आला.

शिवाजीराजे हायस्कूल खोलपेवाडी-साळ (डिचोली) येथील साहिल ज्ञानेश्‍वर गवस हा प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडलचा मानकरी ठरला. कुटुंबातील प्रत्येकासाठी आरोग्यविषयक प्रश्‍नमंजूषाच्या माध्यमातून ही स्पर्धा १ मार्च ते २९ मे २०२३ पर्यंत राबविली गेली.

पहिल्या क्रमांकास १० ग्रॅम सोन्याचे मेडल, द्वितीय क्रमांकास टायटनचे स्मार्ट वॉच, तिसऱ्या क्रमांकास सायकल, चौथ्या क्रमांकास विमान प्रवास तिकिटे, पाचव्या क्रमांकास स्पोर्ट शूज/हेल्मेट, सहावे हेल्थ प्रॉडक्ट्स, सातवे वॉटर बॉटल व ‘कोलगेट’तर्फे दोन हजार उत्तेजनार्थ बक्षिसे या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहेत.

Gomantak Swasthyam
Goa Assembly Monsoon Session: कला अकादमीनंतर क्रीडा स्पर्धेवरुन विरोधकांनी सरकारला घेरले

राज्यभरातून या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरूवारी ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून स्पर्धेचे विजेते काढण्यात आले. संचालक-संपादक राजू नायक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) अरूण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक वितरण व्यवस्थापक भारत पोवार यांनी आभार मानले.

स्पर्धेचे द्वितीय विजेते

(टायटन स्मार्ट वॉच २ )

  • निसम नितेश कुडव, सारस्वत विद्यालय खोर्ली म्हापसा.

  • वंश आनंद गावडे, व्ही.डी.ॲंड एस.व्ही.वागळे विद्यालय मंगेशी-फोंडा

स्पर्धेचे तृतीय विजेते

(सायकल ३ )

  • ऐश्‍वर्या श्रीपाद चव्हाण, भाटीकर मॉडेल हायस्कूल मडगाव,

  • सोहम ज्ञानेश्‍वर शिरोडकर, बालभारती विद्यामंदिर, रायबंदर

  • दिया दीपक नाईक, सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट वास्को

Gomantak Swasthyam
Goa G-20 Summit : ‘जी-20’ स्वच्छ ऊर्जा, मिशन इनोव्हेशन बैठक गोव्‍यात सुरू

स्पर्धेचे चौथे बक्षिस

(विमान तिकिटे ३)

  • क्षितिजा उमेश आरोलकर, रमाकांत खलप हायस्कूल-मांद्रे पेडणे

  • सानिका संदत्त शिरोडकर, वाळपई

  • ओजस विनायक शेट वेरेकर,श्री सरस्वती प्राथमिक मराठी विद्यालय, कुडचडे

स्वास्थ्यम सारखा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल ‘गोमन्तक’ समूहाचे अभिनंदन. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे वाचन संस्कृती वाढीस लागते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो.तसेच त्यांच्यात नेतृत्त्व गुणांची वाढ होण्यास मदत मिळते. यापुढेही असे उपक्रम ‘गोमन्तक’ने सातत्याने राबवावेत,यासाठी माझ्या शुभेच्छा.

शैलेश झिंगडे, शिक्षण खात्याचे संचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com