Sanguem News : डिग्गीतील गौळादेवीची जत्रा उत्साहात; यंदा कोणताही वाहतूक अडथळा नाही

Sanguem News : यंदा देवस्थान समितीने वन खात्याला विनंती करून व गोवा सरकारला आवाहन करून आवश्यक त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून घेतले.
Sanguem
Sanguem Dainik Gomantka

Sanguem News :

सांगे, गोव्याच्या सीमेवरील डिग्गी मायरे (ता. जोयडा) येथील श्री गौळादेवीची जत्रा यंदा कोणत्याही वाहतुकीच्या अडचणीशिवाय मोठ्या उत्साहात पार पडली.

दिवसभरात गोवा तसेच कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन मनोभावे आशीर्वाद घेतला, तर अनेकांनी नवस फेडले.

या जत्रेला सभापती रमेश तवडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, हल्ल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्यासह गोवा - कर्नाटक राज्यातील पोलिस अधिकारी, सनदी अधिकारी खास उपस्थित होते.

गेल्यावर्षी या जत्रेवेळी जंगल भागात पंधरा तास वाहतूक खोळंबल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांचे अन्न पाण्याविना हाल झाले होते. यंदा देवस्थान समितीने वन खात्याला विनंती करून व गोवा सरकारला आवाहन करून आवश्यक त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून घेतले.

शिवाय डोंगराळ भागात सहाचाकी वाहने गेल्यास वाहतूक खोळंबा होत असल्याचे लक्षात घेऊन यंदा सकाळी नऊनंतर सहाचाकी वाहनांना प्रवेश बंद केल्यामुळे आणि पोलिस फोर्स तैनात केल्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय यंदाची जत्रा सुरळीतपणे पार पडली.

मंत्री, अधिकाऱ्यांचा सन्मान

श्री गौळादेवी देवस्थान समितीने रस्ता वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून सहकार्य केलेल्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यात सभापती रमेश तवडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, आमदार आर. व्ही. देशपांडे, दांडेलीचे पोलिस उपअधीक्षक शिवानंद, केपेचे पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे,

सांगेचे पोलिस निरीक्षक प्रवीण गावस, सांगेचे मामलेदार प्रवीण परब, सत्तरीचे मामलेदार राजेश साखळकर, उद्योजक प्रसन्ना घोटगे पाटील, विविध सरपंच, पत्रकार यांचा समावेश होता. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रदीप वेळीप, सचिव महादेव मिराशी, सल्लागार मनीष लांबोर, सदा डोईफोडे, विनोद वेळीप, राजेंद्र मिराशी उपस्थित होते.

Sanguem
Goa Drama : एका रात्रीतील कहाणीचे नाटक : ‘सगळी रात’; प्रभावी संहितेला गालबोट

रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी

गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवरील डिग्गी मायरे (ता. जोयडा) येथील श्री गौळादेवी देवस्थानकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने मोठ्या प्रमाणांवर भाविक उगेमार्गे जंगल मार्गाने कच्च्या रस्त्यातून पहाटेपासून या जत्रेला जात असतात.

गोव्याची शेवटची हद्द असलेल्या जुना गावापर्यंतचा रस्ता राज्य हमरस्ता म्हणून निर्देशीत असताना डांबरीकरण का करण्यात येत नाही असा प्रश्न भाविकांकडून विचारण्यात येत आहे. गोवा सरकारने जुना गावापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करावा, अशी मागणी भाविक करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com