Goa : राजकीय हस्तक्षेपामुळे थंडावली खासगी वाहनांविरुद्धची मोहीम

बेकायदा भाड्याचा धंदा; आठवडाभरात फक्त 76 वाहनांवर कारवाई
Goa Traffic Police
Goa Traffic PoliceDainik Gomantak

राज्यात बेकायदेशीरपणे खासगी वाहने पर्यटकांना भाडेपट्टीवर देणाऱ्या मालकांविरोधात गोवा पोलिसांनी नाताळ ते नववर्षाच्‍या पूर्वसंध्येदरम्‍यान धडक मोहीम सुरू केली होती. मोठ्या प्रमाणात अशी वाहने रस्त्यांवर धावत असतानाही पोलिसांनी दुचाकी व चारचाकी मिळून फक्त 76 वाहने जप्त केली आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे ही मोहीम काहीशी थंडावली आहे. जप्त केलेल्या वाहनमालकांविरोधात गुन्हा दाखल करून वाहतूक खात्याकडे पुढील कारवाईसाठी प्रकरण पाठवण्यात आले आहे. या कारवाईत 1 लाख रुपये दंड व 5 वर्षे कैद अशी शिक्षा आहे.

सदर मोहीम नाताळ सणापासून सुरू करण्यात आली होती. विविध विभागातील पोलिसांनी स्फूर्तीने कारवाई करण्यास सुरुवात केली. जागोजागी पोलिस अशा खासगी पर्यटक वाहनांची चौकशी व तपासणी करत होते. पर्यटकांनी ते वाहन भाडेपट्टीवर घेतल्याचे सांगताच ते ताब्यात घेतले जात होते.

पोलिसांकडून होत असलेल्या कठोर कारवाईमुळे पोलिसांवरच राजकीय दबाव येऊ लागला. या आठवड्यात ‘रेंट ए कार’ तसेच ‘रेंट ए बाईक’ला चांगली मागणी असल्याने काहींनी आपली खासगी वाहनेही भाडेपट्टीवर दिली आहेत. त्यामुळे ही कारवाई शिथिल करण्यासाठी काही भागातील वाहनमालकांनी आमदारांना साकडे घातले आहे. त्यामुळे सक्रीय झालेली ही पोलिस मोहीम अचानक कोलमडली व गेल्या आठवडाभरात 76 वाहनांविरुद्धच कारवाई झाली.

Goa Traffic Police
Purple Fest: ...आणि दिव्यांगही पाण्यावर पोहू लागले, मिरामार येथे महत्वकांक्षी उपक्रमांचे उद्धाटन

कळंगुटमध्‍ये सर्वाधिक 23 वाहनांवर कारवाई

खासगी वाहने भाडेपट्टीवर दिल्यास कायद्यात कारवाईप्रकऱणी असलेली तरतूद गंभीर असल्याने काहींनी ही वाहने भाडेपट्टीवर देणे बंद केले. त्यामुळे काही प्रमाणात वाहनांची संख्या घटली. सर्वाधिक खासगी वाहनांविरोधात कळंगुट पोलिसांनी कारवाई केली. त्यांनी 23 वाहने ताब्यात घेतली. त्‍यात काही अलिशान गाड्यांचाही समावेश होता. पर्वरी पोलिसांनी 8, पणजी पोलिसांनी 7 तर हणजूण पोलिसांनी 5 वाहने जप्त केली. मात्र कारवाईला सुरवात झाल्यानंतर दोन दिवसांनंतर त्यास राजकीय हस्तक्षेपामुळे लगाम आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही पर्यटक खासगी वाहने घेऊन फिरताना त्‍यांची सतावणूक न करण्याच्या सूचना दिल्याने पोलिसांनीही त्यानंतर त्याकडे दुर्लक्षच केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com