Goa Todays News Update 03 March 2024: दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

Goa Todays News: दिवसभरातील मडगाव, पणजी, वास्को, म्हापसा, फोंडा, पर्वरी यांसह राज्यातील घडामोडींचा आढावा
Goa Live Updates
Goa Live Updates Dainik Gomantak

काणकोण येथे बंधारा बांधकामावेळी मातीचा ढिगारा कोसळून मजुराचा जागीच मृत्यू

काणकोण येथील आपेवोळ तळे गावडोंगरी बंधाऱ्याच्या कामावेळी मातीचा ढिगारा कोसळून मजुराचा जागीच मृत्यू. राजेश सिंग (झारखंड) असे मृत मजुरांचे नाव. राजेशला वाचवण्यासाठी गेलेला विशाल सिंग हा मजूर गंभीर जखमी. सदर घटना रविवारी सायंकाळी 5 - 5.30 च्या दरम्याने घडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त.

दक्षिणतील उमेदवाराला 16 हजारांपेक्षा जास्त मते मिळवून देणार- साळकर

दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मुरगाव तालुक्यातील वास्को मतदार संघातून 16 हजार पेक्षा जास्त मते मिळवून देणार असल्याची ग्वाही वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी दिली.

आरक्षणाबाबतची अधिसूचना जारी न केल्यास 6 मार्चपासून पणजीत साखळी उपोषण - एसटी समाजाचा निर्णय

अनुसूचित जमातीला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची अधिसूचना येत्या ४८ तासात जारी न केल्यास ६ मार्चपासून पणजीत साखळी उपोषण आंदोलन सुरू, एसटी समाजाचा निर्णय. गाकुवेध सरचिटणीस रुपेश वेळीप यांची पत्रकार परिषदेत माहिती

गोव्यातील चोऱ्या कधी थांबणार? दोन दिवसांत दोन घटना; पोलीस प्रशासनासमोर आव्हान

काणकोण येथील आगोंदेश्वर मंदिरात चोरी. सुमारे दोन लाखाहून अधिकच मुद्देमाल चोरीला गेल्याचा देवस्थान समितीचा दावा. तर रेडीघाट गणपती मंदिराची फंड पेटी चोरी. मात्र या चोरीतील सहभागी नागवे सत्तरी येथील सुनील कुमार शाहू याला अटक

सां जुझे द आरियलच्या ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घ्या- ग्रामस्थांची ग्रामसभेत मागणी

सां जुझे द आरियल येथील 20 गावकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा ग्रामसभेत एकमताने ठराव. गावातील शांतता आणि सलोखा बिघडवणाऱ्यांवर तक्रार दाखल करा, ग्रामस्थांची मागणी.

साकोर्डा ग्रामसभेत तापला रगाडा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा

रगाडा नदीच्या प्रदूषणाविरोधात कारवाई न केल्याचा साकोर्डा ग्रामस्थांचा पंचायतीवर ठपका. पिण्यासाठी पर्यायी पाणी उपलब्ध करून देण्याचीही ग्रामस्थांची मागणी. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेपुढे पंचायतीचे नमते. प्रदूषणाविरोधात योग्य ती पावले उचलण्याचे दिले आश्वासन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com