Goa Accident Case: अपघातांची मालिका थांबेना; दिवसभरात महामार्गावर चार अपघातांची नोंद

Goa Accident Case: गोवा आणि अपघात हे समीकरण आता दुर्दैवाने तयार होऊ लागलंय.
Accident
AccidentDainik Gomantak

Goa Accident Case: गोवा आणि गुन्हेगारी या तुलनेप्रमाणेच गोवा आणि अपघात हेही समीकरण आता दुर्दैवाने तयार होऊ लागलंय. कालचा बुधवार राज्यासाठी अपघातवार ठरला. कुठ्ठाळी- बांबोळी येथे महामार्गावर एक तर दुसरा अपघात बेतोडा येथे मुख्य बायपास रस्त्यावर झाला.

तसेच शिवोली येथे पर्यटकाचे आपल्या 'रेंट अ कार' च्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली.

या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून GA 03 AH 5534 असा त्या अपघातग्रस्त गाडीचा नंबर आहे.

हा अपघात शिवोलीतील शिवाजी चौकात रात्रौच्या सुमारास झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघात गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तर दुसरा अपघात गोवा-सिंधुदुर्ग सीमेनजीकच्या नयबाग येथे झाला.

कुठ्ठाळी- बांबोळी प्रमाणेच नयबाग येथेही कंटेनर पलटला. ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा बघत घडला. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून यावेळी महामार्गावर रहदारी नसल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

बुधवारी दिवसभरात झालेले अपघात :-

  • कुठ्ठाळी- बांबोळी येथे महामार्गावर अपघात -

शीतपेयांच्या बाटल्यांची वाहतूक करणारा कंटेनर चालकाचे नियंञण सुटल्याने कलंडला. सुदैवाने अपघातात जीवित हानी नाही.

  • बेतोडा येथे मुख्य बायपास रस्त्यावर अपघात -

बेतोडा येथे मुख्य बायपास रस्त्यावर पिकअपची धडक बसून तुकाराम रामा जांगली (रा.बोणबाग वय ४८) हा ठार झाला. फोंडा पोलीसांनी टेम्पो ताब्यात घेतला असून पुढील तपास करीत आहे.

  • शिवोलीतील शिवाजी चौकात अपघात -

पर्यटकाचे आपल्या 'रेंट अ कार' च्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघात गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

  • गोवा-सिंधुदुर्ग सीमेनजीकच्या नयबाग येथे अपघात -

कुठ्ठाळी- बांबोळी प्रमाणेच नयबाग येथेही कंटेनर पलटला. ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा बघत घडला.

मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून यावेळी महामार्गावर रहदारी नसल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी या पूर्वी या जंक्शनवर अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत.

या ठिकाणी सर्कल ,किंवा उड्डाण पुल उभारावा अशी मागणी होत असून, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com