House Theft Case: तेलंगणात घरफोड्या, मुसक्या आवळल्या गोव्यात; 'असा' होता सगळा चोरीचा मामला

House theft Case: कळंगुट पोलिसांनी सतर्कपणे किनारपट्टीभागासह बागा परिसरात शोध मोहीम सुरु केली.
House Theft Case
House Theft CaseDainik Gomantak

House theft Case: तेलंगणा येथे घरफोडी प्रकरणात सहभागी असलेल्या चोरट्याला बागा- कळंगुट येथे पकडण्यात आल्याची माहिती मिळतेय.

या बाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार तेलंगणामधील घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेला आरोपी बागा परिसरात फिरत असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना तेलंगणा पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे कळंगुट पोलिसांनी सतर्कपणे किनारपट्टीभागासह बागा परिसरात शोध मोहीम सुरु केली. याच दरम्यान तेलंगणा पोलीस पथकही गोव्यात दाखल झाले आणि कळंगुटव व तेलंगणा पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आरोपीला बागा येथे यशस्वीरित्या पकडले.

या प्रकरणी कळंगुट पोलीस पथकातील PI परेश नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय नाईक, अमीर गरड, संज्योत केरकर या पोलीस अधिकाऱ्यांनी तेलंगणा पोलिसांना मदत करण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली. चोरीच्या मुद्देमालाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समजू शकली नाही

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com