Tata Memorial: अभिमानास्पद! गोव्याची जेआरडी टाटा मेमोरियल अवॉर्डसाठी निवड

Tata Memorial: गोव्याच्या आरोग्य क्षेत्राची दिल्लीत दखल, मानाचा पुरस्कार मिळणार
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak

Tata Memorial: जेआरडी टाटा मेमोरियल अवॉर्डसाठी गोव्याची आरोग्य, कुटुंब नियोजन, महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना 18 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत आमंत्रित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या संदर्भात अजून सविस्तर माहिती मिळू शकली नाही. गोव्यात आरोग्य, कुटुंब नियोजनच्या दृष्टीने सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असून याठिकाणी रुग्णावर जलदगतीने आणि योग्य उपचार होत असतात.

तसेच आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे हे स्वतः आरोग्य क्षेत्रातील त्रुटींकडे सातत्याने लक्ष घालत असून नुकतीच त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य सेवेसंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती दिलीय.

फोंडा उपजिल्हा इस्पितळात रुग्णांना विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या असून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळामध्येही अत्याधुनिक उपकरणे व सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेतले जातील अशी माहिती देखील त्यांनी दिलीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com