गोवा नोकरभरती प्रक्रिया होऊ शकते रद्द!

गोव्यातील विरोधक आक्रमक : दिल्लीतून भाजप नेत्‍यांना कानपिचक्‍या!
गोवा नोकरभरती प्रक्रिया होऊ शकते रद्द!

गोवा नोकरभरती प्रक्रिया होऊ शकते रद्द!

Dainik Gomantak

पणजी: नोकरभरती (Goa Recruitment) घोटाळ्यावरून विरोधक अधिकच आक्रमक होऊ लागले आहेत. जनसामान्यातही याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून याची धग आता केंद्रापर्यंत गेली आहे. मुख्यमंत्र्यांसह (Pramod Sawant) स्थानिक भाजप (BJP) नेत्‍यांना कानपिचक्या मिळाल्याचीही माहिती आहे. परिणामी मुख्यमंत्री याबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता राजकीय (Goa Politics) वर्तुळात व्‍यक्त केली जात असून नोकरभरती घोटाळ्याची (Goa Job Scam ) चौकशी किंवा ही संपूर्ण प्रक्रियाच रद्द करावी असे दोन पर्याय समोर आले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर राज्य सरकारने विविध खात्‍यांत नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला. मात्र या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर येत आहे. हा मुद्दा विरोधक आक्रमक पद्धतीने जनतेसमोर मांडत आहेत. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’ तर न्यायालयात जाण्‍याच्‍या तयारीत आहेत. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रियाच रद्द करण्याची नामुष्की सरकारवर येऊ शकते.

<div class="paragraphs"><p>गोवा नोकरभरती प्रक्रिया होऊ शकते रद्द!</p></div>
रोहन खंवटेंना BJPमध्ये घेण्यासाठी मनोहर पर्रीकरही होते उत्सुक

काँग्रेसने या प्रकरणात मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री आणि इतर मंत्र्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा तसेच न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल, मगो पक्षही आक्रमक झाले आहेत.

<div class="paragraphs"><p>गोवा नोकरभरती प्रक्रिया होऊ शकते रद्द!</p></div>
Goa Job Scam प्रकरणाची चौकशी करा

कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

अमित पालेकर यांनी या नोकरभरतीविरोधात कोर्टात जाण्‍याचा इशारा दिला आहे. तर, घोटाळा करणाऱ्या मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली. दुसरीकडे गोवा फॉरवर्डचे नेते दुर्गादास कामत यांनी हे प्रकरण राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांच्यापर्यंत पोहोचवत संबंधित मंत्र्यांबरोबरच प्रकरणात गुंतलेले सरकारी कर्मचारी, पॉलिटेक्निक आणि अभियंता कॉलेजच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com