मांद्रे येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

कार्यकर्ता मेळाव्यात मोठा संख्येने उपस्थित रहावे; दयानंद सोपटे यांचे आवाहन मांद्रे..
Goa Politics मांद्रे येथे आयोजित केलेल्या पञकार परिषदेत बोलताना आमदार दयानंद सोपटे सोबत भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब व सचिटणीस संतोष कोरखणकर छाया निवृत्ती शिरोडकर
Goa Politics मांद्रे येथे आयोजित केलेल्या पञकार परिषदेत बोलताना आमदार दयानंद सोपटे सोबत भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब व सचिटणीस संतोष कोरखणकर छाया निवृत्ती शिरोडकरDainik Gomantak

मोरजी (Mandrem): भाजपचा (BJP) मांद्रे मतदारसंघाचा उमेदवार (Goa Politics)  निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून आजच्या मांद्रे येथील मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रेतील कार्यकर्त्यांना केले आहे.

निवडणूक जवळ आल्याने  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी  मांद्रे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळव्याला  कार्यकर्त्यांनी  मोठा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी मांद्रे येथे घेतलेल्या पञकार परिषदेत केले.

Goa Politics मांद्रे येथे आयोजित केलेल्या पञकार परिषदेत बोलताना आमदार दयानंद सोपटे सोबत भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब व सचिटणीस संतोष कोरखणकर छाया निवृत्ती शिरोडकर
डॉ. प्रमोद सावंत यांच्या यजमानपदाखाली महाअभिषेक संपन्न..

मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी कार्यकर्ता मेळव्याबाबत माहिती देण्यासाठी मांद्रे येथे रविवारी पञकार परिषद घेतली. यावेळी व्यासपीठावर मांद्रे मतदारसंघाचे भाजाप मंडळ अध्यक्ष मधू परब व सरचिटणीस संतोष कोरखणकर उपस्थित .

यावेळी कार्यकर्ता मेळाव्याची माहिती देताना सोपटे म्हणाले, मांद्रे मतदारसंघातील कार्यकर्ता याचा मेळावा सोमवार दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता दिनदयाळ भवन मांद्रे येथे आयोजित केला असून या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डाॕ.प्रमोद सावंत , माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंञी श्रीपाद नाईक, भारतीय जनता पार्टीचे गोवा राज्य अध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार दयानंद सोपटे आदी मान्यवर उपस्थित राहणार राहणार असल्याचे सांगितले . या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी यावेळी केले.

Goa Politics मांद्रे येथे आयोजित केलेल्या पञकार परिषदेत बोलताना आमदार दयानंद सोपटे सोबत भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब व सचिटणीस संतोष कोरखणकर छाया निवृत्ती शिरोडकर
शिवोलीची आयोजित ग्रामसभा ऐनवेळी रद्द झाल्याने ग्रांमस्थ आक्रमक!

कार्यकर्त्यांना प्रचार करताना, निवडणूक जिंकण्यासाठी कसे काम करावे , जनसंपर्क मतदारांकडे कसा करावा , संपर्क कसा साधणे, मते वाढण्यासाठी कसे काम करावे . त्यांना आणखीन ज्ञान देण्यासाठी, बुथ यंञणा तसेच मांद्रे मतदारसंघात भाजपचा उमेदवार परत एकदा निवडून आण्यासाठी कार्यकर्त्यांना काम करताना काय करावे लागणार अशा महत्त्वाच्या बाबींचा वा सूचना याबबत मार्गदर्शन करण्यात येईल. मांद्रे मतदारसंघाच्या भाजप पक्षाच्या विविध समित्या आहेत त्यात भाजप मंडळ , महिला समिती, युवा समिती , किसान मोर्चा , ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा आणि इतर ज्या सर्व समित्या आहेत त्या सर्व समित्याच्या पदाधिका-याना आणि बुथ समित्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती दयानंद सोपटे यांनी दिली.

कदाचित पार्सेकर सर व्यस्त अणार म्हणून निमंत्रण पञिकेवर नाव घाण्यास विसरले आसणारः आमदार सोपटे

आमदार दयानंद सोपटे यांना सोमवारी दि.२२ रोजी हरमल येथे सायंकाळी आयोजित केलेल्या राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात निमंञण पञिकेवर नाव न घातल्याने पञकारांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपणास मुद्दाम डावले का असा प्रश्न करीन छेडले असता सोपटे म्हणाले , गोव्याचे माजी मंञी तथा माजी सभापती आणि भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून निवड करुन उच्चपदावर वर्णी लावून जो सन्मान भाजप पक्षाच्या केंद्रातील नेत्यानी गोवा दिला त्या बद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो. आणि माननीय राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. गोव्यासाठी हा मोठा मान असल्याचे सोपटे म्हणाले. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा मांद्रे मतदारसंघात सत्कार होतो हा भाजपचे माजी मुख्यमंञी पार्सेकर सर यांनी आयोजित केला त्यात आमचा सहभाग असावा असे आपण कार्यकर्त्यांनाही सांगितले असल्याचे सांगून पार्सेकर सर हे कदाचित व्यस्त असणार म्हणून ते आपले नाव कार्यक्रम पञिकेवर घालण्यास विसरले असणार असे सोपटे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com