News Live
News LiveDainik Gomantak

Goa Daily News Wrap: अपघात, एसटी आरक्षण, आग आणि राज्यात दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा

Today's Goa New Live: आजच्या 22 फेब्रुवारीच्या गोव्यातील ताज्या घडामोडी...

ट्रकच्या चाकाखाली आल्याने 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

ट्रकच्या चाकाखाली आल्याने शौकत शेख (60, रा. दाबोळी) या व्यक्तीचा मृत्यू. वेर्णाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा दाबोळी जंक्शन येथे अपघात.

दोन धर्मांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडता कामा नये!

गोव्यात दोन धर्मांमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडता कामा नये. सां जुझे दे आरियालमधील प्रकरण व्यवस्थीत रित्या हाताळण्यासंबंधी उपजिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांची माहिती.

एसटी आरक्षण, उद्या (शुक्रवारी) मुख्यमंत्री-शहा भेट!

एसटींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या (शुक्रवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत अपॉईंटमेंट ठरलीय. भेटीची त्यांना माहिती असल्यानेच काही एसटी नेत्यांची शोबाजी सुरू - डॉ.प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मांडवी पुलावर कार दुचाकीचा अपघात, दुचाकी चालक पडला नदीत

पणजीतील मांडवी पुलावर सायंकाळी दुचाकी आणि चारचाकी यांच्यात अपघात झाला आहे. यात ओव्हरटेक करण्याच्या नादात कारची धडक बसल्याने दुचाकी चालक पुलावरुन मांडवी नदीत पडला.

एसटी आरक्षण! मुख्यमंत्र्यांना सात दिवसांची मुदत

गोव्यातील अनुसूचित जमातीसाठी विधानसभेत चार मतदारसंघ राखीव ठेवण्याबाबत अधिसूचना काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सात दिवसांची मुदत.

सरकारने प्रतिसाद न दिल्यास लोकसभा निवडणुकांबाबत भूमिका ठरविण्यासाठी आदिवासी पंचायत घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचा एसटी समाजाचा इशारा.

'सां जुझे दी आरियल'च्या समर्थनात एकवटले स्थानिक

सां जुझे दी आरियल गावच्या समर्थनात एकवटले स्थानिक. वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांच्यासह राज्यातील नागरिकांचाही पाठिंबा. सायंकाळी स्थानिकांकडून कँडल मार्चचे नियोजन.

विकाट भगतला बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी!

सहा वर्षापूर्वी काणकोण येथे आयरिश महिला डेनियल मॅकलॉघलिन हिचा बलात्कार करून खून केलेल्या संशयित विकाट भगत याला बहिणीच्या विवाहाला उपस्थित राहण्यासाठी पोलिस संरक्षणात एक दिवसाची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाची परवानगी.

संशयिताने पाच दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता तो खंडपीठाने फेटाळला.

ताळगाव येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग

ताळगाव येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एक तासापासून प्रयत्न. आग बराचकाळ धुमसल्याने हवेत धुराचे लोळ. आसपासच्या घर, इमारतीत धूर गेल्याने स्थानिकांना त्रास.

दोन्ही जागा भाजप जिंकेल, मंत्री जोशींचा विश्वास

केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांची म्हापसा येथे भाजप गोवा युनिटसोबत बैठक. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन, रणनीतीबाबत चर्चा. भाजप गोव्यातील उत्तर आणि दक्षिण दोन्ही जागा जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास.

आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांची FABC च्या अध्यक्षपदी निवड

गोवा-दमणचे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांची फेडरेशन ऑफ एशियन कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स (FABC) च्या अध्यक्षपदी निवड. थायलंडची राजधानी बँकॉक येथे FABC केंद्रीय समितीच्या तीन दिवसीय बैठकीच्या शेवटच्या दिवशी (22 फेब्रुवारी) झाली निवडणूक.

कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेतील अतिक्रमण हटवले

कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेतील अतिक्रमण हटवले. आरोग्य विभाग, कांदोळी पंचायत आणि आमदार मायकल लोबोच्या पुढाकाराने कारवाई. आरोग्य केंद्राच्या जागेतील अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारीनंतर कारवाई.

 मुरगाव पीडीएचे सदस्य कमलाप्रसाद यादव यांचा राजीनामा

फनेल झोनमधील कायदेशीर घरांवरील कारवाईच्या निषेधार्थ एमपीडीएचे सदस्य कमलाप्रसाद यादव यांचा राजीनामा. कारवाई थांबविण्यासाठी मुरगाव पीडीए काहीच करू शकत नसल्याची व्यक्त केली खंत.

म्हापसा नगराध्यक्ष पदासाठी डॉ. नूतन बिचोलकर यांचा एकमेव अर्ज दाखल

म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी डॉ. नूतन बिचोलकर यांचा एकमेव अर्ज गुरुवारी दाखल. शुक्रवारी होणार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक.

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक सीबीआयच्या रडारावर

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर सीबीआयचे छापे. मुंबईसह यूपी, बिहार, राजस्थान, हरियाणा याठिकाणी छापे. जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी हे छापे मारण्यात आलेत. सत्यपाल मलिक यांनी यापूर्वी पार पाडली होती गोव्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी

स्मार्ट बस शेड्स वादाच्या भोवऱ्यात

पणजी स्मार्ट बस शेड्स हा मोठा घोटाळा असून जनतेच्या पैशांची लूट असल्याचा आरोप खुद्द स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला आहे.

या बस शेड्सचे डिझाइन तसेच तिथे जाहिराती करण्यासंबंधी दिलेले हक्क या सर्व बाबतीत चौकशीची गरज असून त्यासाठी त्वरित बैठक बोलवावी, अशी मागणी बाबूश मोन्सेरात यांनी या पत्रातून केली आहे.

स्वस्त लसूण मिळणे कठीण होऊन बसलंय!

घाटमाथ्यावरून तसेच बेळगावातून आवश्यक तितका पुरवठा होत नसल्यामुळे राज्यात सध्या लसूण 400 ते 600 रुपये किलो या दराने विकली जातेय.

फलोत्पादन महामंडळाच्या गाड्यांवर 280 रुपये किलो दराने लसूण मिळत असली तरी पण तेथील माल लवकर संपत असल्यामुळे अनेकांना स्वस्त लसूण मिळणे कठीण होऊन बसलेय.

धारगळ आणि मोपा रोडवर क्रेन आणि ट्रक उलटण्याच्या घटना

राज्यात अपघातांचे सत्र चालूच असून काल बुधवारी रात्री क्रेन आणि ट्रक उलटण्याच्या घटना घडल्या आहेत. धारगळ येथे वाळू वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना रात्रौच्या सुमारास घडली. भरधाव ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटला.

या अपघातात ड्रायव्हर मात्र बालंबाल बचावला. तर दुसरा अपघात धारगळ येथील मोपा एलिव्हेटेड रोड पुलावर काम करणारी अवजड क्रेन उलटली याही अपघातात क्रेन ऑपरेटरला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com