'कोंकणी उलय, कोंकणी बरय, कोंकणीतल्यांन सरकार चलय' युरी आलेमाव यांचा सरकारला आवाहन

मनोहरराय सरदेसाई यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप सरकार आवाहन
Yuri Alemao
Yuri Alemao

Yuri Alemao: 'कोंकणी उलय, कोंकणी बरय, कोंकणीतल्यांन सरकार चलय' हे ब्रीदवाक्य आचरणात आणून, नामवंत कवी मनोहरराय सरदेसाई यांची जन्मशताब्दी साजरी करूया.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप सरकार कोंकणीसाठी जायात जागे, गोंयकारांनो जायात जागे” असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नामवंत कोंकणी कवी मनोहरराय सरदेसाई यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त स्मरण करताना केले आहे.

मनोहरराय सरदेसाई यांचा जन्म 18 जानेवारी 1925 रोजी झाला. आजपासून साहित्य अकादेमी पुरस्कार विजेत्या गोव्यातील महान कवीचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. गोवा सरकारने हे वर्ष राजभाषा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून साजरे केले पाहिजे, असे युरी आलेमाव म्हणाले.

महान कवी व साहित्यीक मनोहरराय सरदेसाई यांच्या शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी भाजप सरकारकडे काही निधी उपलब्ध असेल अशी मला आशा आहे.

वायफळ इव्हेंट आयोजित न करता, आजच्या तरुण पिढीला मनोहरराय सरदेसाईंनी साहित्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाची माहिती करुन देणारे कार्यक्रमच आयोजित करावेत असेही आवाहन विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केले आहे.

आज केवळ इव्हेंट आयोजनाच्या ध्यासाने वेडे झालेल्या भाजप सरकारला महान गोमंतकीयांचा विसर पडला आहे, हे दुर्दैव आहे. गोवा सरकारने आज मनोहरराय सरदेसाईंच्या स्मरणार्थ एक अधिकृत कार्यक्रम आयोजित करायला हवा होता, असे युरी आलेमाव म्हणाले.

गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याने कला, संस्कृती व साहित्य क्षेत्रात योगदान दिलेल्या सर्व महान गोमंतकीयांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या तारखांसह एक निर्देशिका तयार करावी अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

मनोहरराय सरदेसाईंच्या "गोंयकारानो जायात जागे" या कवितेतील प्रत्येक शब्दातून आपण प्रेरणा घेत पूढे येण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारने आपल्या लोकविरोधी धोरणांनी निसर्गरम्य गोवा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने गोव्याची अस्मिताच पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. गोवा वाचविण्यासाठी गोमंतकीयांनी परत एकदा उठून उभे राहणे गरजेचे आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com