Anjuna Night Club: नाईट पार्ट्यांबाबत आता पंचायतीने 'हे' अधिकार वापरण्याची गरज; आक्रमक स्थानिकांनी केली मागणी

Anjuna Night Club: उच्च न्यायालयाने आदेश देऊनही सकाळी 5 पर्यंत या पार्ट्या सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे.
Night Clubs
Night ClubsDainik Gomantak

Anjuna Night Club: हणजूण, वागातोर या समुद्र किनाऱ्या नजीकच्या गावांमध्ये रात्री १० नंतर चालणाऱ्या नाईट पार्ट्यांमुळे स्थानिक आक्रमक बनले असून नुकतीच या दोन्ही गावातील नागरिकांनी एकत्र येत बैठक घेतली आहे.

उच्च न्यायालयाने आदेश देऊनही हणजुण व किनारपट्टीवरील बहुतांश भागांमध्ये नाईट पार्ट्यांनी ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केला असून सकाळी 5 पर्यंत या पार्ट्या सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे.

रात्रभर मोठ्या आवाजातील संगीत पार्ट्यांमुळे स्थानिकांच्या जीवनमानावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

Night Clubs
Ranji Trophy Cricket Tournament: स्नेहलच्या झुंजार अर्धशतकाने सावरले

या प्रश्नासंदर्भात आवाज उठवण्यासाठी आज 19 जानेवारी रोजी वागातोर येथील फुटबॉल मैदानावर बैठक पार पडली असून बैठकीला आमदार डेलीला लोबो, हणजूण पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर, हणजूण सरपंच तसेच वॉर्ड सदस्य उपस्थित होते.

हणजूण किनारी भागात ही समस्या बऱ्याच कालावधीपासून सुरु असून या प्रश्नाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी वागातोर ग्रामस्थांनीही या बैठकीला उपस्थिती दर्शवली होती.

दरम्यान या बैठकीवेळी उपस्थितांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले असून आजपासून पुढील काळात जर रात्री 10 नंतर कर्णकर्कश आवाजातील नाईट पार्टी सुरू असल्यास त्या आस्थापनांवर संबंधित प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी असा निर्णय घेण्यात आलाय.

तसेच असे प्रकार वारंवार घडत राहिल्यास पंचायतीने क्लबचे लायसन रद्द करण्याचे ठरवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com