Yellow Alert In Goa: यलो अलर्ट! गोवा, सिंधुदुर्गात तीन दिवस पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्याने पावसाची शक्यता
Yellow alert
Yellow alertDainik Gomantak

Yellow Alert In Goa: हवामान खात्याने गोवा आणि सिंधुदुर्गात येत्या तीन दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्याने गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर येत्या तीन दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोवा आणि सिंधुदुर्गात येत्या तीन दिवसात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्याने वारे तेलंगणा, कर्नाटकातून दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी गोव्यात काही ठिकाणी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या होत्या. त्यानंतर येत्या तीन दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात नैऋत्य मान्सूनने भारतातून माघार घेतली, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने होती. 25 सप्टेंबर रोजी नैऋत्य मान्सूनने राजस्थानमधून माघार घेण्यास सुरुवात केली.

भारत 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत झालेला पाऊसच केवळ मान्सूनचा पाऊस म्हणून अधिकृतपणे मोजला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com