Goa Mine: दक्षिण गोव्यातील खनिज खाणींचा लिलाव कधी? खाण कामगार रोजगाराच्या प्रतिक्षेत

खाण अवलंबितांचा प्रश्‍न: कामगार, ट्रकमालकांना प्रतीक्षा
Mining in Goa
Mining in GoaDainik Gomantak

Goa Mine दक्षिण गोव्यातील खनिज खाणी कधी लिलावाला येणार, याची प्रतीक्षा खाणपट्ट्यातील जनतेला लागली आहे. सध्या खजिन मालाचा ई-लिलाव आणि वाहतुकीचे काम वगळता अन्य खाण व्यवसायाशी निगडित हालचाल काहीच नाही.

आजपर्यंत ज्या नऊ खनिज खाणींचा ई लिलाव झाला आहे, त्यात केवळ मायणा - काले येथील एकमेव खाणीचा समावेश आहे. दक्षिण गोव्यातील खाण कामगार, ट्रक मालक, इतर खाण अवलंबित बेरोजगार आहेत. त्यामुळे कधी खाणींच्या ब्लॉक्सचा लिलाव कधी होणार याची खाण अवलंबितांनी प्रतीक्षा लागून आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुजरात येथे हल्लीच पार पडलेल्या २६ व्या पश्चिम विभागीय परिषदेच्या वेळी आणखी पाच खनिज खाणींचे ब्लॉक्स लवकरच ई-लिलावला येणार असल्याचे सांगितले होते.परंतु अद्याप ई-लिलावासंबंधीची निविदा जारी झालेली नाही.

यावेळी दक्षिण गोव्यातील सांगे तालुक्यातील खाणींचा समाविष्ट करण्याची मागणी खाण अवलंबिताकडून होत आहे. कारण याभागातील खाण कामगार बेरोजगार आहेत. ट्रकांना काम मिळत नाही. अन्य खाणीवर अवलंबून असलेल्या लोकांची परिस्थिती बिकट झाली आहे.

याभागातील ई-लिलाव खनिज मालाची वाहतूक एप्रिल शेवटच्या आठवड्यास सुरुवात झाली. पण जेमतेम काम ट्रकांना मिळाले. यंदा ही वाहतूक ऑक्टोबरमध्ये होणार अशी चिन्हे आहेत.

तिसरा खाण ब्लॉक लिलाव कधी?

गोव्यातील खनिज खाणीचा पहिला ई-लिलाव १३ सप्टेंबर २२ रोजी चार खनिज ब्लॉकसाठी झाला होता. यामध्ये शिरगाव मये, डिचोली, मोनं द शिरगाव, काले खनिज खाणीचा समावेश आहे.

दुसरा लिलाव पाच ब्लॉकसाठी १७ एप्रिल २३ रोजी झाला असून अडवलपाल - थिवी, करमळे-कुडणे, थिवी - पिर्ण, कुडणे आणि सुर्ला सोनशी येथील खाणींचा त्यावेळी समावेश झाला आहे.

सुमारे पाच महिने पूर्ण होत आहेत, तरी अद्याप तिसऱ्या ई-लिलावाची निविदा जारी झालेली नाही. खाण पट्ट्यातील लोकांत अस्वस्थता असून लोकांना कायमस्वरूपी खाण व्यवसाय सुरू झालेला हवा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com