Goa Mine: शिरगाव खाण ब्लॉक संबंधी जनसुनावणी रद्द?

Goa Mine: जनसुनावणीला निवडणूक आचारसंहितेचा फटका
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak

Goa Mine: शिरगाव-मये खाण ब्लॉक-२ अंतर्गतच्या जनसुनावणीला निवडणूक आचारसंहितेचा फटका बसला आहे. उद्या (बुधवारी) डिचोलीत होणारी खाण जनसुनावणी अखेर रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.

यासंबंधी संबंधित यंत्रणेकडून अधिकृत माहिती मिळाली नसली, तरी जनसुनावणीसाठी उभारलेला मंडप काढण्यात आल्याने उद्याची जनसुनावणी रद्द झाल्यातच जमा आहे.

शिरगाव खाण ब्लॉक-२ अंतर्गत येणाऱ्या साळगावकर शिपिंग कंपनीला खाण सुरू करण्यासाठी आवश्यक पर्यावरण दाखला मिळण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे उद्या डिचोलीत जनसुनावणी निश्चित केली होती.

मात्र, आता ती रद्द करण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच जनसुनावणीची नव्याने तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निवडणूक आचारसंहितेमुळे जनसुनावणी रद्द करण्यात आल्याचे वृत्त असले, तरी जनसुनावणी कार्यक्रमाबाबत काल मये, शिरगाव भागात ध्वनिक्षेपकाद्वारे जागृती करण्यात आली होती.

त्यामुळे शिरगाव, मये आदी भागातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पूर्वनियोजनाप्रमाणे झांट्ये महाविद्यालयात जनसुनावणी घेण्याचे निश्चित केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com